मनोज जरांगे पाटीलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे. तसेच सदावर्ते यांनी या आंदोलनाची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनासोबत केली आहे. गुणरत्ने सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आंदोलनामुळे यंत्रणा ठप्पहायकोर्टात मराठा आंदोलनाबाबत युक्तिबाबत करताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, या आंदोलनामुळे सीएसएमटी आणि परिसरात चार मोठी रुग्णालय आहेत. तिथलं जनजीवन आणि आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केल जात आहे. कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत. रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात वाट्टेल तसे आंदोलक फिरत आहेत. आंदोलक गाड्यांचे लायसन्स आहे का? असे वाहनधारकांकडे विचारात आहेत, रेल्वे ट्रॅकवर उतरत आहेत, सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत आहेत असं म्हणत सदावर्तेंनी सीएसटीमधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो न्यायाधीशांना दाखवले.
शाळा आणि महाविद्यालयाची काय स्थिती आहे? असा कोर्टाने प्रश्न केला होता. यावर बोलताना महाअधिवक्ता म्हणाले की, उद्यापासून शाळा आणि महाविद्यालय सुरू होणार आहेत अशी माहिती दिली. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, माझी मुलगी शाळेत जाते. एका दिव्यांग मुलाला काल पाच तास ट्राफिकमध्ये अडकल्याने परत याव लागल. आंदोलक अजून लोक आणण्याचे चॅलेंज करत आहेत असंही सदावर्ते म्हणाले.
शरद पवार-उद्धव ठाकरेंची आंदोलनाला मदतआपल्या युक्तिवादात पुढे सदावर्ते यांनी यात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. सदावर्ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक यांना अन्नधान्य ट्रकच्या माध्यमातून पुरवत आहेत. अंतरावालीत सराटीत पोलिसांना मारहाण झाली, महिला पोलिसांनाही मारहाण झाली. काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, पाण्याच्या बॉटल फेकल्या. महिला पत्रकारांची छेड काढली जात आहे असंही सदावर्ते म्हणाले.
सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाची तुलना शाहीन बागच्या आंदोलनासोबत केली आहे. आंदोलकांना शाहीन बागप्रमाणे कोण फंड पुरवत आहे याची चौकशी व्हायला हवी असं सदावर्ते म्हणाले. आता कोर्ट या याचिकेवर नेमका काय निर्णय देणार? आंदोलन थांबणार की सुरु राहणार हे येणारा काळ ठरवणार आहे.