आशिया कप 2025 वरून देशात मोठे वादळ आलेले आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणल्या गेले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला. तर राजकीय आणि इतर संबंध गोठवण्यात आले आहेत. आता आशिया कपमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहे. त्यावरून देशात मोठे वादंग उठले आहे. रक्त वाहिले असताना तिथे पाकिस्तानसोबतचा सामना खेळू नये अशा प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहे. त्यातच आशिया कप सामन्यांचे लाईव्ही स्ट्रीमिंगबाबतच संभ्रमही दूर झाला आहे. आतापर्यंत अनेकांना हे सामने हॉटस्टारवर पाहता येतील असे वाटत असताना असा ट्विस्ट आला आहे.
भारत-पाक हायहोल्टेज ड्रामा
पुढील आठवड्यापासून 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये आशिया चषक रंगणार आहे. यंदा आशिया चषक टी 20 फॉरमॅटमध्ये असेल. भारताचा पहिला सामना हा युएईविरुद्ध 10 सप्टेंबर रोजी होईल. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना होईल की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. बीसीसीआयकडून अथवा केंद्र सरकारकडून हा सामना खेळवला जाणार नाही याविषयीची कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. विरोधी पक्षांनी त्यावरून देशात काहूर उठवले आहे. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
जिओ हॉटस्टारवर नाही, या ठिकाणी सामना पाहा
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर पाहता येईल असा कयास होता. असा अंदाज व्यक्त होत होता. पण आशिया चषकाचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. सामन्यांचे थेट स्ट्रीमिंग हे सोनी लिव्ह ॲपवर पाहता येईल. तर युट्यूबवर या सामन्यातील काही क्लिप्स पाहता येतील. भारताचा पहिला सामना हा युएईशी होणार आहे.पुढील आठवड्यापासून 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये आशिया चषक रंगणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाची निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने 19 ऑगस्ट रोजी आशिया कप 2025 रोजी भारतीय टीमची घोषणा केली होती. पण आजही काही खेळाडूंची निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर टीम इंडियाच्या जर्सीवर कोणत्या ब्रँडचा लोगो असेल याविषयीचा निर्णय पण लवकरच होणार असल्याचे समोर येत आहे.