Ganesh Visarjan 2025 : आज गौरी-गणपतीच्या बाप्पाचे विसर्जन, निरोप देण्याची योग्य वेळ आणि मुहुर्त काय?
Tv9 Marathi September 03, 2025 07:45 AM

गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती विसर्जनाला विशेष महत्त्व आहे. या उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला होतो. काही भक्त आपापल्या श्रद्धेनुसार अनंत चतुर्दशीच्या आधी वेगवेगळ्या दिवशी बाप्पााला निरोप देत असतात. गेल्या रविवारी 31 ऑगस्टला रविवारी पाच दिवसांच्या गणपती विसर्जन झाले. आता सातव्या दिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. जर तुमच्या घरी यंदा गौरी गणपती विराजमान झाले असतील. तर आज तुमची गणेश विसर्जनाची तयारी सुरु असेल. पण गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय, किती वाजता बाप्पाचे विसर्जन करावे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

गणेशोत्सवाचा समारोप कधी?

गणेशोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. गणपती विसर्जनासाठी हा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो, परंतु काही भक्त त्यांच्या परंपरेनुसार दीड, तीन, पाच किंवा सात दिवसांनीही गणपतीचे विसर्जन करतात. पंचांगानुसार, गणेशोत्सवाचा सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. यानंतर, दहा दिवसांच्या गणपती विसर्जन 6 सप्टेंबर रोजी होईल.

विसर्जनाचे मुहूर्त काय?
  • सकाळचा मुहूर्त: सकाळी 9:10 पासून दुपारी 1:56 पर्यंत.
  • दुपारचा मुहूर्त: दुपारी 3:31 पासून संध्याकाळी 5:06 पर्यंत.
  • संध्याकाळचा मुहूर्त: रात्री 8:06 पासून रात्री 9:31 पर्यंत.
  • रात्रीचा मुहूर्त: रात्री 10:56 पासून 3 सप्टेंबरला पहाटे 3:10 पर्यंत.
गणेश विसर्जनावेळी काय करावे?
  • गणेश विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा करा.
  • त्यानंतर त्यांना मोदक, फळे आणि मिठाई अर्पण करा.
  • यानंतर सुख-समृद्धीसाठी बाप्पाकडे प्रार्थना करा.
  • गणपती बाप्पाच्या मंत्रांचा जप करा.
  • विसर्जनाच्या वेळी हलक्या रंगाचे कपडे घाला.
  • विसर्जनाच्या वेळी कोणाशीही वाद घालू नका.
  • या दिवशी चिकन, मासं, मटण असे अन्न खाऊ नका.
विसर्जनाच्या वेळी काय कराल?

दरम्यान गणेश विसर्जनाच्या वेळी पर्यावरणाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही शाडूच्या मातीची मूर्ती वापरत असाल किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती वापरत असाल, तर त्याचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा घरातच बादलीत विसर्जित करा. यामुळे जलप्रदूषण टाळता येते. तसेच, विसर्जनापूर्वी मूर्तीवरचे हार, फुले, प्लास्टिकचे सजावटीचे सामान वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.