डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने खळबळ उडाली. रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, म्हणून भारतावर दबाव टाकला जातोय. मात्र, याच संधीचा फायदा हा थेट चीनने घेतला आणि भारतासोबतची जवळीकता वाढवली. काही महत्वाचे करार हे चीनसोबत भारताने केले. हेच नाही तर जपानच्या दाैऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर गेले. यावेळी पुतिन आण मोदी यांचे फोटो पाहून जगात खळबळ उडाली. सातत्याने भारताला रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता धमकावले जात आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या धमकीला भीक घातली नाही. आता भारताला दुसऱ्या मोठ्या पद्धतीने अमेरिकेकडून झटका देण्यात आलाय.
आता टॅरिफच्या वादातच डोनाल्ड ट्रम्प सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 2 सप्टेंबर 2025 पासून जवळपास सर्वच नॉन इमिग्रंट व्हिसा अर्जदारांना अमेरिकन कॉन्सुलर कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष मुलाखतींना उपस्थित राहावे लागणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबद्दल माहिती दिली. या बदलामुळे बहुतेक वयाच्या आधारित सूट आणि ड्रॉपबॉक्स नवीन करणे समाप्त होते, अर्जदारांना मुलाखती वगळण्याची परवानगी होती. मात्र, आता तसे होणार नाही. H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत काम करणे आता कठीण होत असल्याचे यावरून दिसत आहे.
राजकीय अस्थिरतेमुळे H-1B कामगारांना सरकारकडून टार्गेट केले जात आहे. नवीन नियम विविध प्रकारच्या व्हिसा श्रेणींना प्रभावित करतो. ज्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, चांगले कामगार आणि वारंवार प्रवास करणारे यांचा समावेश आहे. आतापर्यंत 14 वर्षांखालील किंवा 79 वर्षांवरील अर्जदार आणि H-1B कामगार, L-1 कंपनीमध्ये हस्तांतरण, F-1 विद्यार्थी, O-1 असाधारण क्षमता आणि B-1/B-2 व्यवसाय किंवा पर्यटक व्हिसाचे नूतनीकरण करू इच्छिणारे अनेक अर्जदार सूटसाठी पात्र ठरू शकत होते.
आता यामध्येच बदल करण्यात आली आहेत. 2 सप्टेंबरपासून या श्रेणींमधील जवळपास अर्जदारांना मग ते पहिल्यांदाच अर्ज करत असतील किंवा व्हिसाचे नूतनीकरण करत असतील, त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे. यामध्येही काही प्रकरणात सूट देण्यात आलीये. तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा व्हिसा नूतनीकरणाचा प्लॅन करत असाल तर तुम्ही आता मुलाखतीत सवलत ड्रॉपबॉक्स प्रक्रियेसाठी पात्र आहात असे गृहीत धरू शकत नाहीत. तुम्हाला मुलाखत ही द्यावी लागणार आहे.