पालघर, ता. २ : जिल्ह्यात पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवली. मोटार वाहन कायद्यांतर्गत १२८ कारवाया करून ५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. याव्यतिरिक्त ७३ गुन्हेगारांसह ४५ माहितगार गुन्हेगार व कारावासातून सुटून आलेल्या २२ आरोपींची तपासणी करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील १६ ठाण्यांत ही मोहीम राबवली गेली. २७ ठिकाणी नाकाबंदी, तर १९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले गेले. दारूबंदी कायद्यांतर्गत एक लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि १४ गुन्हे दाखल केले गेले. वाहतूक नियम उल्लंघन केल्याबाबत २४ गुन्हे दाखल केले. कोटपाअंतर्गत सहा कारवाया करून एक हजार ७०० रुपये दंड आकारणी करण्यात आली. ही मोहीम पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधिकारी, ७२ अधिकारी व ३४२ कर्मचाऱ्यांनी राबवली, असे सांगण्यात आले.