नवी दिल्ली :
इलेक्ट्रॉनिक आणि वाहन व्यवसायासाठी अत्यावश्यक असणाऱ्या दुर्मिळ धातूंचा पुरवठा मर्यादित करण्याचा निर्णय चीनने घेतल्याने भारताला समस्यांशी दोन हात करावे लागत असून त्यावर उपाय शोधण्यासाठी भारताने दुय्यम स्रोतांमधून या धातूंचे रिसायकल ाRग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण होतात. उपयोग संपल्यानंतर त्या टाकल्या जातात. अशा वस्तूंचे संकलन करुन त्यांच्यावर पुन्हा प्रक्रिया करुन त्यांच्यातील दुर्मिळ धातू मिळविणे आणि त्या धातूंपासून मॅगनेटस् आदींची निर्मिती करणे अशी ही योजना आहे. भारताने वेगाने कृती करण्यास प्रारंभ केला असून विशेष समिती स्थापण्यात आली आहे.