सोलापुरमध्ये महापुरूषांच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. सोलापूर शहरातल्या चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन गु्न्हे दाखल करून घेतले आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात आणि मृत तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरमध्येमहापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुणाला जमावाने हटकलं. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नाही. सोलापूर शहरातल्या फौजदार चावडी पोलिस ठाणाच्या हद्दीतील आज पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून दोघांना ताब्यात देखील घेतलं आहे.
Solapur : सोलापुरात गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू, परिसरात हळहळमहापुरुषांच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मृत तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धक्काबुक्की करून अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन तरुणविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून मृत हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली.
Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viralपोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले की, '३ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एक तरुण अश्लील कृत्य करत होता. ते पाहून पेट्रोलिंग करणारे पोलिस आणि स्थानिकांनी त्या तरुणाला खाली उतरवले. पण तो खाली उतरला नाही त्यामुळे तरुणांनी वरती चढून त्या व्यक्तीला खाली उतरण्यास सांगितले. पण त्याने नकार दिल्यामुळे धक्काबुक्की झाली. या धक्काबुकीत तरुण जखमी झाला. त्याला तात्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.'
पोलिस आयुक्तांनी पुढे सांगितले की, 'ज्या व्यक्तींनी तरुणाला मारहाण केली होती त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मृत तरुणाने अश्लिल कृत्य करून भावना दुखावल्याप्रकरणी पहिला गुन्हा आणि मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दोघांविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत तरुणाची ओळख पटली नाही.'
Solapur : १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना