Pune-Mumbai Railway : पुणे-मुंबईत रेल्वे प्रवास आता आणखी सुकर आणि वेगवान होणार आहे. कारण राज्य शासनानं या मार्गावरील एका महत्वाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्यामुळं पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अजित पवारांनी ट्विट करुन राज्य शासनाच्या या निर्णयाची माहिती देताना म्हटलं की, पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसंच पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.