अमर घटारे
अमरावती : शेजारी राहणाऱ्या दोन परिवारांमध्ये जुना वाद होता. या वादातून बापाच्या हत्येचा बदला घेण्याच्या भावनेतून भयानक कृत्य करण्यात आले आहे. यात शेजाऱ्यांनी मुलासह आईचा घरा समोरच चाकू भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. सदरची घटना तिवसा शहरात घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
अमरावतीजिल्ह्यातील तिवसा शहरातील अशोकनगर परिसरात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सदरची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अमोल वसंतराव डाखोरे (वय ४०) व सुशीला वसंतराव डाखोरे (वय ५८) असे घटनेत मृत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. तर या घटनेत एक दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Bhiwandi Crime : धडापासून शिर वेगळे करत फेकले खाडीत; महिलेच्या हत्येचा उलगडा, धक्कादायक माहिती आली समोरबदल्याच्या भावनेतून भयानक कृत्य
घटनेत हत्या करणारे हे घरा शेजारी राहणारे आहेत. काही वर्षांपासून दोन्ही परिवारांमध्ये वाद होता. या वादात मारेकरींच्या कुटुंबातील एका सदस्यांची हत्याकरण्यात आली होती. या हत्येचा राग मनात असल्याने यातून आज सकाळी दोन्ही परिवारांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातून घराच्या समोरच चाकूने सपासप वार करत निर्घृन हत्या करण्यात आली आहे. यामध्ये दहा वर्षाचा मुलगा देखील जखमी आहे.
Maval : रिंग रोड, टीपी स्कीमला मावळच्या शेतकऱ्यांचा विरोध; शेतकरी मेळाव्यात एकमताने ठरावदोघे स्वतःहून पोलिसात दाखल
मायलेकाची हत्या करून दोघेजण थेट तिवसा पोलीसांच्या स्वाधीन झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. तर दोन्ही आरोपी विरुद्ध गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.