पाकिस्तान क्रिकेटची पुरती वाट लागली आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तान क्रिकेटने नकोशा विक्रमांना गवसणी घातली आहे. दुबळ्या समजले जाणारे संघही पाकिस्तानवर भारी पडत आहेत. आता आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ उतरणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ युएई आणि अफगाणिस्तानविरुद्ध तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेतील अंतिम सामना 7 सप्टेंबरला होणार आहे. असं असताना पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यात पाकिस्तान संघाला मोठा फटका बसला आहे. आता पाकिस्तानचा संघ टॉप 5 यादीतून बाहेर फेकला गेला आहे. दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आणि क्रमवारीत एका क्रमांकाची झेप घेतली आहे. त्यामुळे सहाव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी विराजमान झाला आहे. पाकिस्तानचं मात्र यात नुकसान झालं आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका आहे. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 2-0 आघाडी मिळवली आहे. दक्षिण अफ्रिकेने 1998 नंतर इंग्लंडमध्ये पहिली वनडे मालिका जिंकली.
पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर थेट सहाव्या स्थानावर घसरला आहे. तर इंग्लंडची स्थिती आणखी नाजूक झाली आहे. इंग्लंडचा खराब कामगिरीचा पाढा सुरुच आहे. त्यामुळे आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर होता. पण 100 रेटिंग पॉइंट्सह सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेने सलग दोन विजय मिळवून पाकिस्तानला खाली ढकललं आहे. ही घसरण पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. कारण आशिया कप स्पर्धेपूर्वी नकारात्मक निकालामुळे पाकिस्तानी क्रीडाप्रेमी नाराज आहेत. आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. तरी या क्रमावारीची चर्चा होताना दिसत आहे.
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टीम इंडिया 124 रेटिंग पॉइंट्सह टॉपवर आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी असून 109 रेटिंग गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर 106 रेटिंगसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका 103 रेटिंगसह चौथ्या स्थानी, पाचव्या स्थानी दक्षिण अप्रिका असून सहाव्या स्थानावर पाकिस्तान आहे. तर अफगाणिस्तान सातव्या, इंग्लंड आठव्या, वेस्ट इंडिज नवव्या आणि बांग्लादेश दहाव्या स्थानवार आहे.