Goa News: नागझर- कुर्टी येथे दोन कारची धडक, वाचा दिवसभरातील घडामोडी
dainikgomantak September 06, 2025 10:45 AM
Goa Accident: नागझर- कुर्टी येथे दोन कारची धडक

नागझर- कुर्टी येथील अंडरपासजवळ दोन कारची जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील सर्वजण सुखरूप आहेत.

Goa Crime: गोवा ट्रिप महागात पडली! अहमदाबादच्या वकिलाला महिला थेरपिस्टने गुप्त व्हिडिओ काढून केल ब्लॅकमेल

गोवा ट्रिपनंतर अहमदाबादच्या वकिलाला ब्लॅकमेल घोटाळ्यात अडकवले, महिलेने थेरपिस्ट म्हणून काम केले. तिने गुप्तपणे त्यांचे व्हिडिओ शूट केले आणि ब्लॅकमेल करत त्याच्याकडून २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली. अहमदाबादच्या एलिसब्रिज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Kulem: कुळे येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी पळवली

कुळे बाजार परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली आहे. मंगलदास मायरेकर यांनी आपल्या नातेवाईकांच्या घरासमोर दुचाकी पार्क केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने संधी साधून ती दुचाकी पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केलाय.

खोर्जुवे जमीन हडप प्रकरणी संशयिताला जामीन मंजूर

खोर्जुवे - बार्देश येथील स्व. अनंत नारायण कामत यांचे बनावट मृत्यूपत्र आणि कागदपत्रे तयार करणे व वारसदारांचा विश्वासघात करून त्यांची हजारो चौ. मी. जमीन कटकारस्थानाने हडप केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या संशयित विशांत रामचंद्र कामत (रा. आके - मडगाव) यांची म्हापसा न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली.

Goa Drugs: 8.5 लाखांचे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शिवोलीत नायजेरियन नागरिकाला अटक

गुन्हे शाखेने नायजेरियन नागरिक एझियाशी कॅलिस्टस (वय 38, सध्या वाडो, मर्णा, सिओलिम येथे वास्तव्यास) याला अंमली पदार्थांसह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 4.485 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन, 2.294 ग्रॅम एमडीएमए, 35.593 ग्रॅम कोकेन आणि रोख रुपये 8,50,000 जप्त करण्यात आले.

Goa rain: पुढील चार दिवस पावसाची उघडीप

राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून पुढील चार-पाच दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे. शुक्रवारी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊस आणखी मंदावणार आहे. मागील २४ तासांत १६.४ मिमी पावसाची नोंद केली असून आतापर्यंत राज्यात ११५ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ६.३ टक्के पावसाची नोंद केली आहे.

Teachers Day 2025: शिक्षकदिनाच्या सर्वांना शुभेच्छा

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.