China DF-5B Missile : चीन हा असा देश आहे जो नेहमीच विस्तारवादाच्या भूमिकेत असतो. हा देश सैन्याच्या बळकटीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज युद्ध आणि हल्ल्यांमध्ये मोठा बदल झाला आहे. याच बदलांना लक्षात घेऊन चीनने आपल्या शस्त्रांमध्येही मोठे बदल केलेले आहेत. दरम्यान, आता चीनने संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारे शस्त्र पहिल्यांदाच समोर आणले आहे. आहे. अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही हे शस्त्र संहारक असल्याचे बोलले जात आहे. चीनचे या विध्वंसक शस्त्राचे नाव DF-5B असून ते एक क्षेपणास्त्र आहे.
DF-5B हे क्षेपणास्त्राची विशेषता काय?चीनच्या या DF-5B लाँग रेंज मिसाईलला चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने विकसित केले आहे. चीनने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आंतरखंडीय क्षेपणास्त्र असल्याचे सांगितलले जात असून या क्षेपणास्त्रावर मोठे अण्वस्त्रही नेले जाऊ शकते. DF-5B हे क्षेपणास्त्र DF-5 क्षेपणास्त्रांमधील अत्याधुनिक असे पुढचे व्हर्जन आहे. DF-5 या क्षेपणास्त्राची निर्मिती 1980 च्या दशकात करण्यात आली होती. मात्र काळानुसार या क्षेपणास्त्रात अनेक अत्याधुनिक बदल करण्यात आले. हे क्षेपणास्त्र घन तसेच द्रव इंधनावर आपल्या इप्सित ठिकाणी पोहोचते. लांब पल्ल्यांच्या लक्ष्यांना भेदण्याची या क्षेपणास्त्रात क्षमता आहे.
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 200 पटीने जास्त शक्तीDF-5B हे एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रात साधारण 12 हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष भेदण्याची क्षमता आहे. म्हणजेच जगातील अनेक ठिकाणी हे क्षेपणास्त्र अचूक हल्ला करू शकते. DF-5B या क्षेपणास्त्राची इतरही काही वैशिष्ट्ये आहेत. या क्षेपणास्त्राची मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएन्ट्री व्हेईकल घेऊन जाण्याची क्षमता आहे. म्हणजेच हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक अण्वस्त्र वेगवेगळ्या लक्ष्यांवर हल्ला करू शकते. या मिसाईलच्या प्रत्येक युनिटची शक्ती हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 200 पटीने जास्त आहे. या क्षेपणास्त्राच्या प्रत्येक युनिटमध्ये तीन ते चार मेगा टन शक्ती आहे.
याच कारणामुळे चीनचे हे DF-5B नावाचे क्षेपणास्त्र जगात सर्वाधिक घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जात आहे. चीनकडे हे क्षेपणास्त्र असल्याने जागतिक पटलावर चीनची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे.