आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे.
माजी अष्टपैलू इरफान पठानने भारताची तगडी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
भारत १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध, तर १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळणार आहे.
Sanju Samson batting at No.5 in Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धा आता तीन दिवसांवर आली आहे. ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईत पोहोचला आहे आणि त्यांनी कालपासून सरावाला सुरुवात केली आहे. १५ जणांच्या या संघातून प्लेइंग इलेव्हन कशी असेल, हे काही जागांवरून अडले आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने त्याची मजबूत भारतीय प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. त्याने सातत्याने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रिंकू सिंह आणि शिवम दुबे या दोन खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
इरफान पठानने निवडलेल्या संघात पंजाबची जोडी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना सलामीला संधी दिली गेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याने तिलक वर्माची निवड केली आहे. मधल्या फळीमध्ये ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.
Asia Cup 2025 : भारत, पाकिस्तानसह सर्व ८ संघ जाहीर; कोणती टीम तगडी, कुठे Live पाहता येणार? सामन्यांच्या वेळेत झाला बदलयष्टीरक्षक-फलंदाज म्हणून इरफानने संजू सॅमसनवर विश्वास दाखवला आहे. पण, शुभमनच्या येण्याने संजूला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी दिली आहे. संजूने या स्थानावर जास्त खेळ केलेला नसला तरी पठानला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.
गोलंदाजीत पठानने फिरकीत कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्थीला स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहची जोडी दिसणार आहे. पाच फलंदाज, दोन अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाज असा ५-२-४ फॉरमॅट इरफानने वापरला आहे.
भारतीय संघाला १० सप्टेंबरला पहिल्या लढतीत यूएईचा सामना करायचा आहे. त्यानंतर १४ सप्टेंबरला ‘हाय व्होल्टेज’ सामना पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाईल. अखेरचा गट सामना १८ सप्टेंबरला ओमानविरुद्ध अबू धाबी येथे रंगणार आहे.
मोठी घोषणा! Shreyas Iyer च्या गळ्यात कर्णधारपदाची माळ; १९७ धावा करणाऱ्या यष्टिरक्षकालाही मिळाली संधीइरफान पठाणची प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्थी