Uttrakhand : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या कार्यकाळात २५ हजार तरूणांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या
esakal September 07, 2025 05:45 AM
CM Pushkar Dhami Provides 25,000 Govt Jobs to Uttarakhand Youth

राज्यातील सर्वच घटकांच्या हितासाठी काम करणारे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांची ओळख आहे. कारण, त्यांनी नुकत्याच झालेल्या मिटींगमध्ये वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम स्थापन करणार असल्याचे सांगितले होते. तर चार वर्षाच्या काळात तरूणांच्या बेरोजगारी बाबतही मोठे निर्णय घेतले आहेत.  

Uttrakhand : ‘स्वदेशी अपनाओ, राष्ट्र को आगे बढ़ाओ’, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा नारा; देहरादूनमध्ये आयोजित अभियानाचे नेतृत्व केले

पुष्कर सिंह धामी यांच्या कार्यकाळात विक्रमी २५ हजार तरुणांची सरकारी सेवेत निवड झाली आहे. याच अनुषंगाने शनिवारी जनजाती कल्याण विभागाच्या राजकीय आश्रम पद्धती विद्यालयांमध्ये निवड झालेल्या १५ सहायक शिक्षकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

४ जुलै २०२१ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर धामी सरकारने तरुणांना रोजगार व कौशल्य विकास यावर विशेष भर दिला. या काळात लोक सेवा आयोग, उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोग आणि वैद्यकीय सेवा निवड आयोग यांच्या माध्यमातून २५,००० हून अधिक तरुणांना सरकारी सेवांमध्ये रोजगार देण्यात आला आहे.

उत्तराखंड लोकसेवा आयोग आणि अधीनस्थ सेवा निवड मंडळाच्या माध्यमातून अजूनही अनेक विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये लवकरच अंतिम निवड संस्तुती केली जाणार आहे. त्यामुळे एकूण स्थायी नोकर्यांचा आकडा आणखी वाढणार आहे.

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, मुख्यमंत्री धामी यांनी तातडीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, दिले आदेश परदेशात रोजगाराच्या संधी

सध्याच्या सरकारने ९ नोव्हेंबर २०२२ पासून मुख्यमंत्री कौशल्य उन्नयन आणि जागतिक रोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेतून तरुणांना हॉस्पिटॅलिटी (आतिथ्य), नर्सिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रशिक्षण देऊन जर्मनी आणि जपानमध्ये रोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत १५४ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यापैकी ३७ जणांना जपानमध्ये रोजगार मिळाला आहे.

धामी सरकारने २०२४ मध्ये परीक्षांसंदर्भात कठोर नकलविरोधी कायदा लागू केला आणि पेपरफुटी माफियांवर कठोर कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. या कायद्यानंतर एकाही परीक्षेत पेपर लीक झालेला नाही. इतकंच नव्हे तर १०० हून अधिक माफियांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी त्यांच्या राज्यातच उपलब्ध करून देणे.

Uttarakhand : महिलांनी स्वयंरोजगार करावा यासाठी उत्तराखंड सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; दोन लाखांच्या कर्जावर मिळतेय इतके अनुदान

सरकार तरुणांसाठी शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा प्रयत्न आहे की उत्तराखंडचे पाणी आणि तरुणाई, याच राज्याच्या विकासासाठी वापरली जावी. तरुणांनी स्थलांतर न करता, स्वतः रोजगार निर्माण करणारे बनावे, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.