'मला आवडणाऱ्या लोकांना मी आवडत नाही' लग्न न करण्यावर ऋतुजा बागवे म्हणाली...'जोडीदार नसण्याचं कारण....'
esakal September 08, 2025 12:45 PM

1 ऋतुजा बागवे 'आरपार' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

2 मुलाखतीत तिने आपल्या जोडीदाराबद्दल आणि नात्यातील तडजोडीबद्दल प्रामाणिक मत व्यक्त केलं.

3 तिचं लग्नाचं गणित जुळत नाही आणि व्हाइब मॅच होत नाही असं ती हसत हसत म्हणाली.

'तु माझा सांगती' तसंच 'नांदा सौख्यभरे' या मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवे घराघरात पोहचली. अनेक वेळा तिच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणात कौतूक होताना पहायला मिळालं. दरम्यान आता ती 'आरपार' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त ती अनेक ठिकाणी प्रमोशनमध्ये बिझी असल्याचं पहायला मिळतय. अशातच आता तिचा एका मुलाखतीमधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल आणि होणाऱ्या जोडीदाराबद्दल भाष्य केलय.

एका युट्यूब चॅनलला मुलाखत देताना ऋतुजाला तिच्या जोडीदाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने कसा जोडीदार हवा यावर भाष्य केलय. ती म्हणाली की, 'मला योग्य जोडीदार कधीच मिळत नाही. माझी आणि समोरच्या व्यक्तीची कधीच व्हाइब मॅच होत नाही.'

तसंच पुढे बोलताना म्हणाली की, 'आमच्या काळातील मुलांना तडजोड म्हणजे त्याग असं वाटतं. कोणतही नातं निभावण्यासाठी तडजोड गरजेची असते. त्यानंतरच नातं बहरतं. आपल्याला जोडीदार हा हक्काचं कोणीतरी असावं यासाठी हवा असतो. मला जोडीदार न मिळण्याचं कारण माझं गणितच जुळत नाही. मला आवडणाऱ्या व्यक्तींना मी आवडत नाही. आणि मी ज्यांना आवडते ते मला आवडत नाही.' असं ती मुलाखतीत बोलताना म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)

FAQs

ऋतुजा बागवे कोणत्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे?

ती 'आरपार' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे.

ऋतुजा बागवेने मुलाखतीत काय सांगितलं?

तिने जोडीदार, लग्न आणि नातेसंबंधातील तडजोड याबद्दल प्रामाणिक मत व्यक्त केलं.

तिच्या म्हणण्यानुसार योग्य जोडीदार का मिळत नाही?

कारण तिची आणि समोरच्या व्यक्तीची व्हाइब मॅच होत नाही असं ती म्हणाली.

नातं टिकवण्यासाठी काय गरजेचं आहे असं ती म्हणाली?

तडजोड ही नातं निभावण्यासाठी आवश्यक आहे असं तिचं मत आहे.

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.