काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमधील रावी, सतलज आणि चिनाब नद्यां नद्यांना पूर आला. या पुरामुळे 25 जिल्हातील 4100 पेक्षा जास्त गावांवर परिणाम झाला. 26 ऑगस्ट पासून ते आता पर्यंत पंजाबमध्ये जवळपास 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण बेघर झाले आहेत, त्यांच्याकडे खाण्यासाठी काही नाही, काही लोक बेपत्ता आहेत त्यांचा अद्याप शोध सुरु आहे. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (PDMA) महासंचालक इरफान अली काठिया यांनी मदत छावण्या आणि वैद्यकीय सेवांबाबत माहिती दिली.
56 जणांचा मृत्यू
नद्यांना आलेल्या पुरामुळे पाकिस्तानात मोठे नुकसान झाले आहे. पूरामुळे 25 जिल्ह्यांतील 4100 हून अधिक गावे प्रभावित झाली आहेत. स्थानिक माध्यमांनी PDMA च्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, 26 ऑगस्टपासून आतापर्यंत पंजाबमध्ये किमान 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पूरात वाहून गेलेल्या लोकांना शोधण्यासाठी शोध मोहिम अद्याप सुरु आहे. PDMA चे महासंचालक इरफान अली काठिया यांनी पत्रकारांना सांगितले की, या आपत्तीमुळे अंदाजे 4.1 कोटी लोक प्रभावित झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर विस्थापनाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात 425 मदत छावण्या आणि तंबू नगरी स्थापन केली आहेत, जिथे तात्पुरते निवारा आणि अन्न पुरवले जात आहे.
वाचा: लग्न ठरताच तरुण झाला उतावळा! सुहागरातीआधीच करु लागला ती मागणी, नंतर जे घडलं…
1,75,000 रुग्णांवर उपचार
पाकिस्तानातील प्रमुख दैनिक ‘डॉन’ने काठिया यांच्या हवाल्याने सांगितले की, 500 हून अधिक वैद्यकीय छावण्या कार्यरत आहेत. तेथे जखम, संसर्ग आणि जलजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या सुमारे 1,75,000 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. बचाव पथकांनी आतापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. PDMA चे महासंचालक इरफान अली काठिया यांनी सांगितले की, पंजाबच्या कृषी क्षेत्रात उपजीविकेच्या संरक्षणासाठी 1.5 कोटीहून अधिक जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवली गेली आहेत.
यापूर्वी, PDMA ने सांगितले होते की, पंजाबमधील सध्याच्या पूरामुळे 42 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. रावी, सतलज आणि चिनाब नद्यांच्या काठावरील 4100 हून अधिक गावे जलमय झाली आहेत. मुल्तानचे उपायुक्त वसीम हामिद सिंधू यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने हेड त्रिमू येथून येणाऱ्या संभाव्य पूराच्या लाटेला तोंड देण्यासाठी एक व्यापक कार्ययोजना तयार केली आहे. चिनाब नदीवरील हेड मुहम्मदवाला आणि शेरशाह पूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे, ज्यामुळे संरक्षक बंधाऱ्यांवरील दबाव कमी झाला आहे.
नवीन पाण्याच्या प्रवाहामुळे नदीची पाण्याची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)च्या मते, 26 जून रोजी मान्सूनच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाने आणि पूराने देशभरात 900 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे आणि 1,000 हून अधिक जण जखमी झाले आहेत.