अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. अनेक देश हे अमेरिकेच्या या निर्णयाच्या विरोधात पुढे आले. भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात कमी झालीये. याचा फटका हा उद्योगांना देखील बसलाय. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात भारताने आपली भूमिका तटस्थ ठेवलीये. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादाला लागून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की हे देखील भारताविरोधात आग ओकताना दिसले. हेच नाही तर वोलोदिमिर जेलेंस्की यांच्यासोबत भारताचे संबंध चांगले आहेत. आता त्यांनी भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफबद्दल अत्यंत मोठे आणि धक्कादायक असे विधान केले.
वोलोदिमिर जेलेंस्की यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारतावर अमेरिकेने लावलेला 50 टक्के टॅरिफ अगदी बरोबर असल्याचे म्हटले, ज्याने खळबळ उडाली. वोलोदिमिर जेलेंस्की यांनी मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, भारत, चीन आणि रशिया एकाच मंचावर आले, त्यावेळी मला त्यांच्यामध्ये जुगलबंदी दिसली. मला स्पष्ट वाटते की, भारतावर अमेरिकेने जो टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे.
रशियासोबत जे देश व्यापार करतात त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे सध्या जे पाऊले उचलत आहेत, त्यावर मी खूप म्हणजे खूप जास्त आनंदी आहे. मला वाटते की, रशियासोबत कोणताही व्यापार झाला नाही पाहिजे. भारतावर टाकलेल्या निर्बंधांचे मी स्वागत करतो. पुतिनचे सर्वात मोठे हत्यार तेल आणि गॅस आहे. ते विकून त्यांना ताकद मिळत आहे. त्यांची तीच ताकद काढून घेतली पाहिजे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता सातत्याने दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी या मान्य केल्या नाहीत. हेच नाही तर अमेरिकेच्या नाकावर टिच्चू भारताने रशियासोबत अजून काही महत्वाची करार तेलाबाबत केली आहेत. हेच नाही तर ऑगस्ट महिन्यापेक्षा अधिक प्रमाणात भारत हा सप्टेंबर महिन्यात अधिक तेल रशियाकडून खरेदी करत आहे. मात्र, जेलेंस्की यांचे टॅरिफच्या मुद्द्यावरील भाष्य हे भारतासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल.