लग्नानंतर महिलांवर असंख्य जबाबदाऱ्या येतात. लग्नाआधी आई – वडिलांच्या राज्यात बिनधास्त जगणारी मुलगी लग्नानंतर मात्र जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबते… अनेक जबाबदाऱ्या नवीन लग्न झालेल्या मुलीला पार पाडाव्या लागतात… अशात सासरच्या मंडळींकडून अनेक बंधनं महिलांवर लादली जातात. लग्नानंतर, ती लग्नापूर्वी तिच्या पालकांच्या घरी ज्या गोष्टींचा आनंद घेत होती त्या गोष्टी आता तिला करता देखील येत नव्हत्या. इथे, तिला थांबवण्याचा प्रयत्न करणारे बरेच लोक असतात. अशा परिस्थिती महिला स्वतःसाठी वेळ काढते आणि घरात कोणी नसल्यावर स्वतःचे स्वप्न पूर्ण करते… विवाहित महिला लग्न झाल्यावर एकट्या घरात काय करतात जाणून घेऊ…
आराम आणि झोप – विवाहित महिलांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करावं लागतं. महिलांवर अनेक जबाबदाऱ्या येतात. अशात महिला घरात एकट्या असल्यावर पूर्ण झोप घेतात आणि आराम करतात.
नवीन कपडे ट्राय करणं – जेव्हा घरात कोणी नसतं, तेव्हा महिला स्वतःला वेळ देतात. महिलांना मॉर्डन कपडे घालायला प्रचंड आवडतं. विशेषतः ज्या घरांमध्ये महिलांना सलवार सूट किंवा जीन्स घालण्याची परवानगी नाही, त्या महिला घरी एकट्या असताना नवीन कपडे ट्राय करुन पाहतात.
ब्यूटी ट्रीटमेंट: महिला घरी एकट्या असतात तेव्हा सौंदर्याकडे देखील विशेष लक्ष देतात. म्हणूनच ते मुलतानी माती, मेहंदी लावणे इत्यादी घरगुती उपायांचा वापर महिला करतात. काही महिला या काळात ब्युटी पार्लरमध्ये जाणं देखील पसंत करतात. सामान्य व्यस्त दिवसांमध्ये, महिलांना त्यांच्या शरीराकडे इतकं लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.
फोनवर बोलणं : महिलांना बोलण्याची खूप आवड असते हे प्रत्येकाला माहिती आहे. घरी कोणी नसताना त्या कोणाशीही बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्या त्यांच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी अनेक तास फोनवर बोलतात.
मैत्रिणींसोबत पार्टी : विवाहित महिला जेव्हा घरी एकट्या असतात तेव्हा मैत्रिणींना घरी बोलावतात आणि पार्टी करतात. इतर दिवशी जेव्हा सासू – सासरे घरी असतील तेव्हा कोणासोबत जास्त बोलू शकत नाही किंवा कोणाला घरी बोलवू शकत नाही. अशात घरी एकट्या असल्यामुळे महिला पार्टी करतात.
डान्स – अनेक महिलांना डान्स करायला प्रचंड आवडतं. पण सासरी महिला हवं तसं राहू शकत नाही. अशात घरी कोणी नसतं तेव्हा महिला डान्स करतात. गाण्याचा आवाज मोठा करुन महिला भरपूर डान्स करतात. अनेक महिला व्हिडीओ देखील शूट करतात. शिवाय रिल्स देखील करतात.