अनेकदा बाजारात मिळणाऱ्या भाज्या आणि फळांवर कृत्रिम खते आणि कीटकनाशके वापरली जातात. पिकांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेतात कीटकनाशके फवारतात. मात्र हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ही कीटकनाशके शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. यासोबतच रोगप्रतिकारकशक्तीवर देखील परिणाम होतो. त्यामुळे बाजारातून आणलेल्या भाज्या आणि फळे स्वच्छ धुणे गरजेचे आहे.
व्हिनेगर
व्हिनेगर भाज्या आणि फळे स्वच्छ करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काही प्रमाणात व्हिनेगर मिसळा. त्यात फळे आणि भाज्या बुडवा. काही वेळाने स्वच्छ पाण्यात पुन्हा एकदा भाज्या,फळे धुवून कोरडी करा.
बेकिंग सोडा
भाज्या आणि फळे बेकिंग सोड्याने स्वच्छ करणे देखील एक चांगला उपाय आहे. पाण्यात चार चमचे बेकिंग सोडा घाला आणि या मिश्रणात फळे आणि भाज्या १५ मिनिटे बुडवा. यामुळे भाज्या आणि फळे स्वच्छ होतील.
हळदीचे पाणी
बेकिंग पावडर आणि व्हिनेगर व्यतिरिक्त, तुम्ही हळदीच्या पाण्याने फळे आणि भाज्या स्वच्छ करू शकता. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे फळे आणि भाज्या धुणे खूप चांगले मानले जाते. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मीठाच्या पाण्याने देखील फळे आणि भाज्या स्वच्छ करू शकता.