५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली
esakal September 09, 2025 05:45 PM

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता सुशांत शेलार याच्या 'दुनियादारी' चित्रपटातील एका डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हमे सस्ती चिजो का शॉक नही असं म्हणणारा सुशांत आता भलत्याच अडचणीत सापडलाय. काही दिवसांपूर्वी सुशांतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यात तो खूप बारीक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र तो आपला चित्रपटासाठीचा लुक असलीच त्याने सांगितलं. आता सुशांत एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याच्यावर एका मराठी उद्योजकाने मोठे आरोप केले आहेत. काम करण्यासाठी सुशांतने आपल्याकडे पैसे मागितले असं त्याने सांगितलंय. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

साऊथ मुंबई न्यूज या इंस्टाग्राम चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती म्हणते, 'मला कळत नाही मी आता काय करु? कधीकधी वाटतं जीव द्यावा. इएमआयचे हफ्ते भरु कुठून मी.. असे जर समाज सेवक असतील तर… काय कामाचे हे समाज सेवक. गोरेगावसारख्या ठिकाणी एक उत्तर भारतीय तो माझ्या अंगापर्यंत आला. काय राहिलं मराठी माणसाचं? आपल्याच विभागामध्ये जर असे समाजसेवक असतील तर… आणि बोलतो मी मराठी मी मराठी. अरे कसला मराठी. मी दहा ठिकाणी प्रयत्न केले. वरळीपासून, महालक्ष्मीपासून ते आपल्या इस्ट पर्यंत (गोरेगाव). जर माझ्याच विभागात जर मला उद्योक करुन देणार नसतील आणि शिंदे सरकारचे असे समाजसेवक असतील तर ते काय कामाचे?'

व्यवसायासाठी गाडी लावण्यासाठी जागा मिळवण्यासंदर्भातही ती व्यक्ती सुशांतवर टीका करताना दिसते. पुढे ती व्यक्ती सुशांत शेलारवर आरोप करताना म्हणते की, 'मी सुशांतला 2 हजार रुपये देतो. समोरून तो म्हणतो, 5 हजार देशील तर काहीतरी फायदा आहे ना. 2 हजार रुपये मीच तुला देतो ये, असं बोलून त्याने फोन कट केला.' ती व्यक्ती म्हणते, 'माझ्या गल्लीत स्टॉल लावण्यासाठी किती पैसे घेतात, विचार तू तिकडे किती भाडं घेतात ते?'

View this post on Instagram

A post shared by South Mumbai (@southmumbainews)

या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अत्यंत निराश दिसत आहे आणि 'मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे' असंही म्हणते. ती सुशांतला आव्हान देत म्हणते की, 'मी अशा दगा फटकांना घाबरत नाही. त्यांच्यामध्ये जर खरोखर हिम्मत असेल तर समोर येऊन वार करावा. एवढं मी चॅलेंज देतो. कारण मी आता माझ्या जिवाला कंटाळलो आहे..'

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'मराठी सिनेमांमध्ये याला उभं करत नाय मग आता नवीन धंदा' अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या एकाने 'काका मनसे वाल्यांकडे जा' असा सल्ला दिला आहे.

ते सगळं खेदजनक... सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर लेक श्रियाचं थेट भाष्य? म्हणते- बाबांना त्याने...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.