Prakash Ambedkar on Maratha Reservation : मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत अन्न-पाणी त्याग केला होता. अखेर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं. सरकारने जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्याने मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे. मात्र ओबीसींचं धाबं दणाणलं असून मराछ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहेय ओबीसी नेते या निर्णयाचा निषेध करत मैदानात उतरले असून छगन भुजबळ यांनीही कडाडून विरोध दर्शवला आहे.
त्यामुळे मनोज जरांगेंना धक्का बसलेला असतानाचा आता यांसद्रभात आणखी एका मातब्बर नेत्यानेही विरोध दर्शवला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मुद्यावर थेट मत मांडलं असून त्यांना ते पटलं नसल्याचंच त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने कायद्याला धरून निर्णय घेतला नाही छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ओबीसीतून मराठा आरक्षणाला आता वाढता विरोध असून त्यामुळे जरांगे यांना धक्का बसू शकतो.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
सरकारचा निर्णय झाला त्यावेळी मीम्हणालो होतो की सरकारने हा निर्णय कायद्याला धरून घेतलेला नाही. ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. यावेळी त्यांनी (औरंगाबाद) संभाजीनगर खंड पीठाच्या जजमेंटचा दाखला दिला. सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असं त्यात नमूद करण्यात आलं होतं, आणि त्यावर सुप्रीम कोर्टातही शिक्का मोर्तब झालं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.
निझामी मराठा जो सत्तेत बसलेला आहे, त्याला गरीब मराठा आणो ओबीसी मध्ये भांडण लावायचे आहे. निझामी मराठा हे सर्व सत्तेत आहेत, ते ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावतात. सरकारने जे सर्व मराठा ओबीसी आहेत, ही भूमिका घेतली आहे, त्याला ओबीसी विरोध करत आहेत. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, आणि आरक्षण असूच नये असे गोंधळ घालायला सुरवात केली आहे असेही ते म्हणाले.
सर्वात मोठा शत्रू ओबीसी
भारतय जनता पक्ष म्हणतोय की आमचा डीएनए ओबसी आहे, पण ओबीसींनी हे समजून घेतलं पाहिजे की सर्वात मोठा शत्रू ओबीसी आहे. मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात आहे. त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे
दोन चार ओबीसी जिल्हा परिषदला निवडून येण्यापेक्षा, सर्व बॉडी ओबीसी कशी निवडून येईल असे प्रयत्न केले पाहिजे. ओबीसींना राजकीय धोका आहे हे ओळखुन घेतले पाहिजे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
मराठा समाजाचं ताट वेगळं पाहिजे
यावेळी ते मनोज जरांगेंबद्दलही बोलले. त्यांच्या (जरांगेंच्या) टीममधील वकील(योगेश केदार) आहेत, त्यांनी सल्ले दिले, ते मान्य केले नाहीत. भाजप जे ओबीसी डीएनए म्हणत आहे ते संपलेले आहे, आणि ओबीसींचे खरे विरोधक आता भाजपा आहे अशी टीका आंबेडकरांनी केली. मराठा समाजाला न्याय देऊ शकतो पण त्यांचे ताट वेगळे पाहिजे याचा पुनरुच्चार आंबेडकरांनी केला.