श्रेयस अय्यर IN, जसप्रीत बुमराह OUT! सर्फराज खानचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असेल संघ
esakal September 08, 2025 06:45 PM
  • आशिया चषकानंतर भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारतात होणार आहे.

  • शुभमन गिल घरच्या मैदानावर प्रथमच कसोटी मालिकेत नेतृत्व करणार आहे.

  • जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

Shreyas Iyer comeback: Jasprit Bumrah rested for West Indies Test series : आशिया चषक २०२५ स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती. कर्णधार म्हणून गिलचा तो पहिलाच परदेश दौरा होता आणि आता घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत विजयासाठी गिल उत्सुक आहे. या मालिकेसाठीचा संघ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

विंडीजनंतर भारताला घरच्या प्रेक्षकांसमोर दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघाने दोन्ही मालिका गाजवल्यास WTC Final मध्ये जाण्याची शक्यता बळावू शकते. भारत-वेस्ट इंडिज पहिली कसोटी २ ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आणि १० ऑक्टोबरपासून दुसरी कसोटी अरूण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत कसोटी संघात काही बदल मिळण्याची शक्यता आहे.

Asia Cup 2025 संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यर प्रथमच व्यक्त झाला; "पात्र असूनही संधी मिळाली नाही, खूप त्रास होतोय"

इंग्लंड दौऱ्यावर वर्क लोड मॅनेजमेंट म्हणून तीन कसोटी खेळणारा जसप्रीत बुमराह विंडीजविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार आणि स्पर्धेची फायनल २८ सप्टेंबरला होणार आहे. शुभमन गिल आशिया चषक संपवून कसोटी संघात नेतृत्व करणार आहे. त्याशिवाय लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इश्वरन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हेही संघात असतील.

रिषभ पंतला इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाली होती आणि त्याचे विंडीजविरुद्ध खेळणे अवघड आहे. आर अश्विनच्या निवृत्तीनंतर घरच्या मैदानावरील भारताची पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे अक्षर पटेलला संधी आहे. साई सुदर्शन व करुण नायर यांना इंग्लंड दौऱ्यावर मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे त्यांना बाकावर बसवले जाऊ शकते. तर श्रेयस अय्यर व सर्फराज खान यांचे पुनरागमन होऊ शकते.

Who is IAS Sakshi Sawhney? युवराज सिंगने कौतुक केलं, त्या साक्षी साहनी आहेत तरी कोण? व्यक्त केली भेटण्याची इच्छा

भारताकडे तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा सक्षम फलंदाज नाही आणि विंडीज मालिकेत अभिमन्यूकडे ती जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जलदगती गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज नेतृ्त्व सांभाळेल. मोहम्मद शमीचे पुनरागमन शक्य आहे, तर प्रसिद्ध कृष्णा किंवा अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते. नितीश रेड्डी त्याचे स्थान कायम राखण्यात य़शस्वी होईल.

India's Probable Squad For West Indies Tests - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, अभिमन्यू इश्वरन, सर्फराज खान, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा/आकाश दीप/अर्शदीप सिंग , कुलदीप यादव.

FAQs

प्रश्न 1: वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची कसोटी मालिका केव्हा आणि कुठे होणार आहे?
➡️ पहिली कसोटी २ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आणि दुसरी कसोटी १० ऑक्टोबरला अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल.

प्रश्न 2: शुभमन गिलची कसोटी मालिकेत भूमिका काय असेल?
➡️ शुभमन गिल घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.

प्रश्न 3: जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल का?
➡️ इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

प्रश्न 4: कोणते खेळाडू पुनरागमन करू शकतात?
➡️ श्रेयस अय्यर आणि सर्फराज खान यांचे कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

प्रश्न 5: भारताच्या गोलंदाजीचं नेतृत्त्व कोण करेल?
➡️ मोहम्मद सिराज मुख्य वेगवान गोलंदाज असेल, तसेच मोहम्मद शमीही संघात परतू शकतो.

प्रश्न 6: रिषभ पंत खेळणार का?
➡️ इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे पंतचा वेस्ट इंडिज मालिकेत खेळणे कठीण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.