आम आदमी पक्षाची जोरदार टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता रविवारी त्यांचे पती मनीष गुप्ता यांच्यासोबत एका सरकारी अधिकृत बैठकीत पोहोचल्या. या बैठकीचे फोटोही व्हायरल झाले असून त्यात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पतीही अधिकाऱ्यांसोबत बसलेले दिसत आहेत. रेखा गुप्तांचे पती मनीष गुप्ता हे एक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बैठकीतील उपस्थितीबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दात टीका केली आहे. ‘आप’ने एक्स वरील बैठकीच्या छायाचित्रासह ‘पंचायत’ वेब सिरीजमधील एका दृश्याचा व्हिडीओ शेअर करत दिल्लीत ‘फुलेरा की पंचायत’चे सरकार सुरू असल्याचे ट्विट केले आहे.