मॅटर्निटी वेअर खरेदी करताय? मग या गोष्टी महत्त्वाच्या
Marathi September 08, 2025 10:26 PM

गरोदरपणात शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. अशा परिस्थितीत आईच्या आरोग्यासह तिच्या कपड्यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण कपडे केवळ दिसण्यासाठीच नाही तर आराम आणि सोयीसाठी खूप महत्त्वाचे असतात. या दिवसात बऱ्याच महिला दररोजचे कपडे घालतात. पण, यामुळे अस्वस्थता आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच मॅटर्निटी वेअर खरेदी करताना काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. आज आपण जाणून घेऊयात मॅटर्निटी वेअर खरेदी करताना काय लक्षात घेणे आईसह बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

  • या दिवसात कपडे खरेदी करताना हवामानाचा विचार करा.
  • उन्हाळ्यासाठी सुती कपडे आणि हिवाळ्यासाठी गरम पण, सैल कपडे निवडावेत.
  • कपडे खरेदी करताना डिझाइनपेक्षा आरामावर लक्ष केंद्रीत करावे.
  • हलके, श्वास घेण्यायोग्य सैल अशा कापडाचे कपडे घालावेत.
  • खूप जास्त घट्ट कपडे खरेदी करू नये. याचा परिणाम केवळ आईवर नाही बाळाच्या आरोग्यावरही होतो.
  • सुती कापड गरोदरपणात घालण्यासाठी उत्तम फॅब्रिक आहे.
  • गर्भधारणेदरम्यान पोटाचा आकार वाढतो, त्यामुळे वाढत्या पोटाचा आणि शरीराचा आकाराचा विचार करून स्ट्रेचेबल कपडे किंवा फ्रि साईजचे कपडे खरेदी करू शकता.
  • स्तनाच्या आकारात बदल झाल्यामुळे जुन्या ब्रा वापरणे त्रासदायक होऊ शकते.
  • मॅटर्निटी ब्रा खरेदी कराव्यात, जेणेकरून तुम्हाला आरामदायक वाटेल आणि शारीरिक त्रास होणार नाही.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=wsewiumqlce

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.