छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात काही नवीन मालिका सुरू झाल्या. तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही दिवसातच आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आणि त्याजागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र झी मराठीने आता आणखी एक मोठं पाउल उचललं आहे. झी मराठी वाहिनीने नुकत्याच सूरू झालेल्या मालिकेची वेळ बदलली आहे. यापूर्वी झीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली होती. आता आणखी एका मालिकेची वेळ बदलण्यात आलीये.
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम ९ वाजता प्रसारित होत होता. मात्र आता तो साडेनऊ वाजता प्रसारित होत आहे. झी मराठीवर दोन वर्षानंतर 'आम्ही सारे खवय्ये' हा कार्यक्रम सुरू झाला होता. ९ ऑगस्ट २०२५ रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा शो शनिवार रविवार दुपारी १ वाजता दाखवण्यात येत होता. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करत आहे. यावेळेस शोची थीम पूर्णपणे बदलण्यात आली आहे. ‘आम्ही सारे खवय्ये- जोडीचा मामला’ अशी यंदाची थीम असून गेल्या महिन्याभरात मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या जोड्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
View this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
मात्र महिन्याभरातच या मालिकेची वेळ बदलली आहे. आजपासून म्हणजेच ८ सप्टेंबरपासून हा शो सोमवार आणि मंगळवार दुपारी १ वाजता प्रसारित केला जाईल. यापुढे हा शो प्रत्येक सोमवार मंगळवारी प्रसारित होणार आहे. २००७ पासून वाहिनीवर या कार्यक्रमाची सुरूवात झालेली होती. आजवर प्रशांत दामले, राणी गुणाजी, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांनी हा कार्यक्रम होस्ट केला आहे. घराघरांतील गृहिणी मोठ्या आवडीने हा कार्यक्रम पाहतात.
महिन्याभरात हेमंत ढोमे-क्षिती जोग, कुशल बद्रिके-सुनयना, शिवानी रांगोळे- विराजस कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे व तिचा पती स्वप्नील राव, अक्षया देवधर- हार्दिक जोशी, अभिजीत- सुखदा असे अनेक कलाकार या शोमध्ये सहभागी झाले होते. प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत होता. आता नवीन वेळेत प्रेक्षक कार्यक्रमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. दरम्यान ८ सप्टेंबरच्या भागात या शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती सहभागी होणार आहेत.
आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री