Amitabh Bachchan Marathi Post: महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे बिग बी ट्रोल देखील होत असतात. आता देखील त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी एक्सवर लालबागच्या राजाचा एक फोटो पोस्ट करत ‘गणपति बप्पा मोरया… लाल बाग च राजा…’ असं लिहिलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची चूक पकडली आहे.
‘लाल बाग च राजा…’ असं मराठीत लिहिण्यात चूक झाल्यानंतर बिग बींनी पुन्हा एक पोस्ट लिहिली आणि माफी देखील मागितली. बिग बी म्हणाले, ‘माझ्या एका शुभचिंतकाने सांगितलं, मी ट्वीट चुकीचं केलं आहे. त्यामुळे दुरुस्त करत आहे. ‘लालबाग चा राजा..’ क्षमा प्रार्थी…’ असं बिग बी नंतरच्या ट्विटमध्ये म्हणाले. सध्या अमिताभ बच्चन यांचे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
T 5494 – गणपति बप्पा मोरया 🙏🙏
लाल बाग च राजा !!! pic.twitter.com/yKxlzqe05J— Amitabh Bachchan (@SrBachchan)
T 5494(i) – हमारे एक शुभचिंतक ने कहा, की हमनें कल के ट्वीट में ग़लत शब्द लिख दिया है , तो उसे सही कर रहा हूँ ।
मैंने लिखा था ‘लालबाग ‘च’ राजा ‘
उन्होंने कहा होना चाहिए ‘चा ‘ सो सही कर रहा हूँ।
लालबाग चा राजा 🙏🙏
क्षमा प्रार्थी— Amitabh Bachchan (@SrBachchan)
अमिताभ बच्चन यांनी स्वतःची चूक दुरुस्त केली. पण अनेकांनी त्यांना ट्रोल केलं, तर अनेकांनी त्यांचं कौतुक देखील केलं. गेल्या इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राहात आहात, तरी देखील मराठी येत नाही… असं अनेक जण बिग बी यांना म्हणाले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तुम्ही हे गुगल ट्रान्सलेटमधून केलं आहे. ते चुकीचं ट्रान्सलेट झालं आहे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मराठी भाषा कठिण नाही, फक्त मनापासून शिकता आली पाहिजे…’
सुपरस्टार रजनीकांत यांचं दिलं उदाहरण..याच दरम्यान, अन्य एका नेटकऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचं उदाहरण दिलं. ‘सर तुम्ही बरोबर बोलत आहात… रजनीकांत मराठी असून सुद्धा तामिळनाडूला स्वतःची मातृभूमी मानतात आणि तामिळ भाषेला त्यांनी पूर्णपणे आत्मसात देखील केलं आहे. त्यांचं बालपण कर्नाटकात गेलं. त्यामुळे त्यांना कन्नड भाषा माहिती आहे. पण रजनीकांत मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील बोलतात आणि महाराष्ट्राने तुम्हाला इतकं मोठं केलं आहे, पण तरीही तुम्हाला नीट मराठी बोलता येत नाही याचं आम्हाला वाईट वाटतं.’ सध्या सर्वत्र बिग बींच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.