विजय पांढरे यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार ठरवले.
फडणवीस आणि मोदी यांनी पवारांचे पाप झाकले, असा आरोप.
माधवराव चितळे समितीचा अहवाल असूनही कारवाई टाळली गेली.
कारवाई झाली तर अजित पवार दोन दिवसांत जेलमध्ये जातील, असा दावा.
राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळाबाबत आता नवा वाद उफाळून आला आहे. या प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप आणि टीका होत असताना यात विजय पांढरे यांनी उडी घेतली. पांढरे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी,'अजित पवारांचं सिंचन घोटाळ्याचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं', असा थेट आरोप त्यांनी केला आहे. पांढरे यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पांढरे यांनी व्हिडिओत म्हटलं की, 'अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती, तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते', असं पांढरे म्हणाले. 'मात्र,देवेंद्र फडणवीसयांनी अजित पवारांचं जलसिंचन घोटाळ्याचं पाप लपवलं. या गोष्टीला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला आहे', असा आरोप विजय पांढरे यांनी केला.
तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघडविजय पांढरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता होते. पांढरे यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, अजित पवार यांच्याविरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. काल ८ संप्टेंबर रोजी त्यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओद्वारे त्यांनी थेट आरोप केले.
मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?त्यांनी सांगितले की, 'जलसिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधवराव चितळे समिती नेमण्यात आली होती. पण चितळेंनी अहवालात खरी परिस्थिती मांडली नाही. परिणामी सरकारला अजित पवारांवर कारवाई टाळण्याची संधी मिळाली', असं पांढरे म्हणाले.
विजय पांढरे यांनी असाही दावा केला की, 'लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांना क्लीनचिट दिल्याचं लेखी स्वरूपात नागपूर खंडपीठात सादर केलं होतं. मात्र, अद्याप खंडपीठानं ती क्लिनचीट मान्य केलेली नाही. त्यामुळे सुनावणी प्रलंबित राहिली. ही अडचण आहे', असं पांढरे म्हणाले.
गर्ल्स हॉस्टेल बनलं देहविक्रीचा अड्डा; व्हॉट्सअॅपवर डील अन् मोठी रक्कम, १० तरूणींसह ११ जण ताब्यात