चिंचवड : खग्रास चंद्रग्रहणाच्या (ब्लड रेड मून) दुर्मीळ खगोलीय दृश्यासोबतच शनी ग्रहाचे सोमवारी (ता. ७) निरीक्षण करत खगोलप्रेमींनी मोठ्या उत्साहाने त्याचा आनंद घेतला. एकूण ३ तास २८ मिनिटे चाललेल्या या ग्रहणाचे थेट निरीक्षण करण्यासाठी सायन्स पार्कमध्ये रात्री उशिरापर्यंत खगोलप्रेमींनी गर्दी केली.
सायन्स पार्कमध्ये रात्री १० ते १२ या वेळेत विशेष दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली. आकाश ढगाळ असतानाही ढगांच्या लपंडावातून प्रेक्षकांनी चंद्रग्रहण पाहिले. पावसाच्या रिमझिम सरी व अधूनमधून ढग दाटून येत असतानाही नागरिकांनी मध्यरात्रीपर्यंत कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी चंद्रग्रहणासोबतच शनी ग्रहाचे दर्शन घेण्याची संधीही उपस्थितांना मिळाली.
सायन्स पार्कतर्फे चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आले. तसेच प्रेक्षकांशी संवाद साधत चंद्रग्रहणाविषयीचे समज-गैरसमज दूर करण्यात आले. सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
Ayush Komkar Case: पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार; कुटुंबियांनी फोडला एकच टाहो | Pune News | Sakal News मोशी प्राधिकरणातही सोयपिंपरी ः खग्रास चंद्रग्रहणामुळे ‘ब्लड रेड मून’ तयार झाला. त्याला पाहण्यासाठी वंडर्स ऑफ युनिव्हर्सतर्फे मोशी प्राधिकरण येथे करण्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये खगोलप्रेमींसाठी दुर्बिणीद्वारे चंद्रग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली. रिमझिम पाऊस पडत असूनही मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मुलांनी गर्दी केली होती.
रात्री ११ वाजल्यानंतर आकाशातील ढग निवळल्याने आकाश स्वच्छ झाले आणि लाल केशरी चंद्र आकाशात दिसू लागला. त्यानंतर सर्व लोकांनी दुर्बिणीद्वारे चंद्रावर पडलेली पृथ्वीची सावली पाहिली. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसले, अशा प्रकारचा चंद्र पहिल्यांदाच पाहिल्याचे इथे आलेल्या लहान मुलांनी सांगितले.