इस्राईलचा अमेरिकेच्या या मित्र देशावर हवाई हल्ला, हमासच्या वरिष्ठ नेत्यांना केले टार्गेट,आकाशात उठले धुराचे लोट
GH News September 10, 2025 01:14 AM

दोहा: इस्रायलने कतारची राजधानी दोहावर मोठा हल्ला करत हमासच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की राजधानी दोहात स्फोटांचे आवाज ऐकायला आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की हल्ला दोहाच्या कटारा विभागात केला गेला. ज्या इमारतीला या हल्ल्यात टार्गेट केले ती संपूर्ण उद्धवस्त झाली आहे. या हल्ल्याने इस्रायलने युद्धाची नवीन आघाडी सुरु केल्याची भीती व्यक्त होत आहे. कतार हे मध्य पूर्वेतील अमेरिकेचा जवळचे राष्ट्र असून हमासचे समर्थक आहे.

जेरूसलेम हल्ल्याचा बदला ?

इस्राईलने हा हवाई हल्ला जेरूसलेममध्ये झालेल्या गोळीबाराच्या बदल्यात घेतला आहे. या हल्यात किमान पाच इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर काही सैनिक जखमी झाले होते. हमासने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. असे म्हटले जात आहे की हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेला हा हल्ला याचे उत्तर मानले जात आहे.

जेरूसलेम गोळीबारात 5 जणांचा मृत्यू

वास्तविक, एक दिवसापूर्वी उत्तरी जेरुसलेमच्या एका गर्दीच्या चौकातील एका बस स्टॉपवर हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात किमान पाच जणांचा मृत्यू झाला होता. यात 12 जण जखमी देखील झाले होते. इस्रायली पोलिसांनी सांगितले की हल्लेखोरांनी बस स्टॉपवर वाट पाहात असलेल्या लोकांवर गोळीबार केला होता. तर इस्रायली मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोर एका भरलेल्या बसमध्ये चढले आणि त्यांनी आतील लोकांवर गोळीबार केला. पोलिसांनी सांगितले की घटनास्थळावर उपस्थित एका सुरक्षा कर्मचारी आणि एका सर्वसामान्य नागरिकाने हल्लेखोरांना ठार केले.

इस्रायलमध्ये नागरिकांवर हल्ले

गाझातील युद्धाने इस्राईलच्या ताब्यातील वेस्ट बँक आणि इस्राईल दोन्ही भागात हिंसेत वाढ झाला आहे. पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्राईल आणि पश्चिमी तटावर इस्राईलींवर हल्ला केला आणि त्याची हत्या केली. तर पॅलेस्टाईनच्या भागात रहाणाऱ्यात हिंसेची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून इस्राईलमध्ये छोटेमोठे हल्ले झाले आहेत. परंतू शेवटचा घातक सामुहिक गोळीबार ऑक्टोबर 2024 मध्ये झाला होता. तेव्हा वेस्ट बँकच्या दोन पॅलेस्टाईन नागरिकांनी तेल अविव क्षेत्रात एक प्रमुख बुलेवार्ड आणि लाईट रेल्वे स्टेशनवर गोळीबार केला होता, ज्यात सात लोक ठार झाले होते आणि काही जण जखमी झाले होते. हमासच्या सैन्य शाखेने याची जबाबदारी घेतली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.