पिंपळगाव (वाखारी): गणेशोत्सव पाठोपाठ नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. या उत्सवासाठी लागणारे मातीचे घट सध्या फिरत्या चाकावर आकार घेताना दिसत आहेत. या कामासाठी सध्या कुंभार बांधवांची लगबग पहायला मिळत आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी काळी माती आणि गाळ यांचा तुटवडा भासत आहे. घट बनवून ते भाजण्यासाठी लागणारे सरपणही शोधावे लागत आहे.
नवरात्रोत्सव मातीच्या घटाला विशेष महत्व असते. हे घट बनविण्यासाठी काळी माती, धरणातील गाळ लागतो. काळी माती २००० रुपये ट्रॉली या भावाने मिळते. मात्र, काळ्या मातीचा तुटवडा जाणवत आहे. यासोबत लागणारा गाळ धरणातून आणावा लागतो. मात्र, गाळाचा उपसाही धरण परिसरातील लोक करू देत नाही. घोड्याची लिद, सरपण लागते. परिसरात घोड्यांची संख्या कमी आहे.
मेंढपाळ लोकांकडे घोडे असायचे आता त्यांचीही संख्या कमी झाल्यामुळे घोड्यांच्या लिदचाही तुटवडा निर्माण झाला आहे. साहित्याला कुंभार बांधवांना ३० ते ३५ हजार खर्च येतो. मात्र सध्या मातीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. मेहनत व कौशल्याचा आधारे फिरत्या चाकावर तयार करण्यात येणारे घट मात्र ८ ते ९ रुपये या कवडीमोल भावात विकले जातात. हे घट उन्हात वाळवून भट्टीत भाजले जातात.
व्यावसायिकांच्या अडचणी
घट भाजण्यासाठी, सरपणाचा तुटवडा, जुने टायर जाळून भाजण्याची कामे, अधिक पैसे देऊनही, काळी माती नाही, बागायती जमिनीमुळे माती, मिळत नाही, धरण परिसरातून गाळ मिळत नाही
लालबाग राजाच्या विसर्जनावरून वाद, गुजराती कंपनीला कंत्राट दिलं म्हणणाऱ्याविरोधात मंडळ कोर्टात जाणारआमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. मात्र, वर्षागणिक निर्माण होणारी परिस्थिती, आवश्यक साहित्याचा तुटवडा पाहता हा व्यवसाय करणे कठीण आहे. भरपूर मेहनत करूनही मनासारखा मोबदला मिळत नाही.
- रघुनाथ तानाजी जगदाळे, कुंभार व्यावसायिक, वाखारी