डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव येथील श्री समर्थ कॉम्प्लेक्स या सात मजली अनधिकृत इमारतीवर कारवाईचा प्रश्न चिघळला आहे. या इमारती मधील राहिवासी सोमवारी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर उतरले. चार महिन्याचे मुल आहे, कोणाची आई वडील आजारी आहेत, बँकेचं लोन डोक्यावर आहे. असे असताना आता आम्ही कोठे जायचं अशी आर्त हाक देत, अनेक प्रश्न करत या रहिवाशांनी वैतागून आता कारवाईला आले तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ असा इशारा सरकारला दिला.
डोंबिवलीपूर्वेतील आयरे गाव, टावरे पाडा रोड येथे उभारण्यात आलेल्या समर्थ कॉम्प्लेक्स या सात मजली अनधिकृत इमारतीवर कारवाईचा प्रश्न चिघळला आहे. आर.सी. सी. अनधिकृत बांभकाम, प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केडीएमसी पालिका प्रशासनाने बांधकाम धारक अक्षय सोलकर यांना नोटीस बजावून सदर बेकायदा बांधकाम स्वखर्चाने काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या इमारती मध्ये एकूण 60 कुटुंब रहात आहेत.
Mumbai Accident: वरळी सी-लिंक कोस्टल रोडवर अपघात, पोलिसाचा मृत्यूया इमारतीवर 20 ऑगस्ट रोजी कारवाई प्रस्तावित होती. मात्र, त्या दिवशी मुसळधार पावसामुळे व प्रभागातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने कारवाई थांबवण्यात आली होती. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाडकामाची कारवाई निश्चित करण्यात आली होती. मात्र कारवाईच्या दिवशी इमारतीतीलमहिला रहिवासी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर उतरल्या. "जर पालिकेने कारवाई केली तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ," असा इशारा त्यांनी दिला. रहिवाशांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली.
याविषयी महिला राहिवाशी धनश्री कांबळे म्हणाल्या, माझी आई आजारी आहे. कालच रुग्णालयातून तिला घरी आणण्यात आले आहे. 22 लाखाचं लोन घेतलेलं आहे. जर या इमारतीवर एक हातोडा जरी पडला तर मी माझ्या आईसह पूर्ण कुटुंबाला अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेईल असे त्या म्हणाल्या.
राहिवासी दीपाली वैश्य या म्हणाल्या, माझी सहा महिन्यांची मुलगी आहे. आता आमच्यात हिंम्मत राहिलेली नाही कोणता लढा लढत बसण्याची. कधी ही कारवाई च्या नोटीस येतात. पोलीस, अधिकारी येतात. लहान मुले आमची घाबरू लागली आहेत. सगळी कागदपत्र पाहूनच आम्ही घर घेतली आहेत. मग आता हे कस काय. जर कारवाई झाली तर मी माझ्या मुलीसह येथे जीव देईल.
Railway Update: आता पनवेलहून थेट बोरिवलीला जाता येणार, प्रवाशांना दिलासा मिळणार!दरम्यान, या प्रकरणात शिवसेना ठाकरे गट सुद्धा रस्त्यावर उतरला. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, काही झालं तरी, "ही कारवाई होऊ देणार नाही," राहिवाशांच्या बाजूने आम्ही खंबीर उभे आहोत असे सांगितलं. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय पातळीवर या प्रकरणाला अधिकच उधाण आलं आहे. पालिका कारवाईस आता तूर्त स्थगिती देण्यात आली असली, तरी पुढील घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.