नसरापूर, ता. १० ः भोर तालुक्यातील देगाव, नायगाव, करंदी खे. बा. या तीन गावांची मिळून असलेल्या देगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री चंद्रशेखर ढेकाणे, तर उपाध्यक्षपदी संगीता रघुनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष वासुदेव कोंडे व उपाध्यक्ष दौलत खुडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागांसाठी ही निवड संस्थेच्या कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पवार यांनी, तसेच सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव दिलीप खुडे यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे संचालक वासुदेव कोंडे, दौलत खुडे, बाबासाहेब गोळे, पंढरीनाथ जाधव, गणेश गोळे, सुशिल यादव, विजय यादव, सुभाष खाटपे, चंद्रशेखर यादव, शिवाजी कोंढाळकर, सुरेश बोरगे उपस्थित होते. या बिनविरोध निवडीसाठी आबासाहेब यादव, आबासाहेब शेलार, तुळशीराम सावंत, आदिनाथ जगताप, राजेंद्र ढेकाणे आदींनी प्रयत्न केले. निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
05788, 05787