'सायको कुठला' जयंत-जान्हवीच्या संसारात कुणीतरी येणार गं.. लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, 'छोटा जयंत पण आता..'
esakal September 12, 2025 10:45 AM

Laxmi Nivas Serial: झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील पात्र हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका नेहमी ट्रोल होत असली तरी प्रेक्षक आवडीने ही मालिका पाहतात. या मालिकेतील भावना आणि सिद्धूची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तर जयंत जान्हवीला आता नवी काय शिक्षा देणार हे बघण्यासाठी प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट बघतात.

दरम्यान काही दिवसापूर्वी लक्ष्मी निवास मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. मालिकेत सध्या जान्हवीला ती प्रेग्नेंट असल्याचं कळतं. त्यामुळे नव्या बाळाच्या येण्याने जयंतच्या वागणुकीत बदल होईल असं तिला वाटतं. त्यामुळे ती जयंतला आनंदाची बातमी देण्यासाठी प्लॅन करत असते. यावेळी ती केकसह फुग्यांनी घर सजवते.

दरम्यान अशातच आता झी मराठीने लक्ष्मी निवास मालिकेचा नवा प्रोमो शेअर केलाय, या प्रोमोमध्ये जान्हवीचं सप्राईज पाहून जयंत जान्हवीला विचारतो, 'हे काय आहे?' त्यावेळी ती म्हणते, 'आज मी तुला एक स्पेशल न्युज देणार आहे. आपल्याकडे नवा पाहुणा येणार आहे.' त्यावर जयंत तिला विचारतो, 'कोण येणार आहे.' त्यावर जान्हवी त्याला बोलते, 'कदाचित छोटा जयंत किंवा क्युटअशी छोटी जान्हवी.' जान्हवीचं हे उत्तर सप्राईज ऐकून जयंतच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.

आता जयंतला आपली बायको प्रेग्नंट असल्याचं समजतं, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. ते पाहून जान्हवी सुद्धा घाबरते. दरम्यान आता जयंत बाळाबाबत काय निर्णय घेतो हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दरम्यान मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी वैतागले आहे. त्यांनी कमेंट्स करत म्हटलं की, 'देवमाणूसमधील डॉक्टरपेक्षा सायको आहे जयंत' तर दुसऱ्यांनी म्हटलं की, 'तुम्ही या दोघांबाबत काहीच चांगलं नाही का दाखवू शकत' तर एकाने म्हटलं की, 'कुणीतरी येणार गं आणि लवकरच मरणार गं' अशा कमेंट्स प्रोमोवर येताना पहायला मिळत आहे.

अखेर आहिल्यादेवीसमोर आदित्य-पारुचं सत्य समोर येणार, दोघांना देवीआई घराबाहेर काढणार, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, 'हा फालतूपणा...'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.