'माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल...' निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ, पुण्यात खळबळ
Saam TV September 12, 2025 01:45 PM
  • पुण्यात निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने सुनेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप.

  • “मुलाकडून अपत्य होणार नाही, माझ्यासोबत राहा” अशी ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार.

  • पीडित सुनेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

  • सासरा, सासू आणि पतीविरोधात गुन्हा दाखल, परिसरात खळबळ उडाली.

पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जावयाने सुनेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुनेला मूल होत नसल्यामुळे सासऱ्यांनी (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) सुनेला अपत्य होण्यासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं. सुनेनं थेट पोलीस ठाणे गाठत सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सहकार नगर परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली. तीस वर्षीय विवाहित महिलेचं ३५ वर्षीय तरूणासोबत लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र, दोघांना अपत्य होत नव्हते. महिला गरोदर राहत नव्हती. तरूण मूल होण्यासाठी सक्षम नसल्याचे कुटुंबियांना माहिती होते.

पुणेकरांसाठी गुड न्यूज! येरवडा- कात्रज भुयारी मार्ग होणार तयार? वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

मात्र, तरीही पीडित महिलेचे त्या पुरूषासोबत लग्न लावून दिले. मात्र, यानंतर सासऱ्याची नियत फिरली. सासरा हा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त असल्याची माहिती आहे. लग्नानंतर सासरे सुनेच्या खोलीत गेले. नंतर सुनेला, 'मुलाकडून तुला अपत्य होणं शक्य नाही. माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव', असं त्यांनी सांगितलं.

गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट, आत्महत्या करण्यामागची धक्कादायक कारणे समोर

या गोष्टीला सुनेनं नकार दिला. नंतर सासऱ्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली. पीडित महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांसमोर आपबिती सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह त्यांची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.