बीडच्या गेवराईतील लुखामसला गावात माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण उघडकीस.
प्रकरणात पूजा गायकवाड हिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नातेवाईकांचा आरोप – गोविंद बर्गेंना पैशांची मागणी व ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केले.
कसून चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नातेवाईकांची.
बीडच्या गेवराईतील लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मात्र, या प्रकरणात विविध ट्विस्ट समोर येत आहेत. या प्रकरणी बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाड हिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आता गोविंद यांच्या नातेवाईकाने धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
गोविंद यांचे नातेवाईक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले की, 'आमच्या दाजींचा घातपात झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे या प्रकरणात कसून चौकशी झाली पाहिजे. आमच्या दाजींकडे रिव्हॉल्वर नव्हतीच. त्यादिवशी रिव्हॉल्वर कशी काय आली?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुणेकरांसाठी गुड न्यूज! येरवडा- कात्रज भुयारी मार्ग होणार तयार? वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार'गोविंदला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलंय. आमच्या दाजींना बऱ्याच दिवसापासून त्रास दिला जात होता. गेल्या पंधरा दिवसापासून ते अतितणावात होते. त्यांना वारंवार पैशांची मागणी केली जात होती. ब्लॅकमेल केलं जात होतं', अशी माहिती गोविंदच्या नातेवाईकांनी दिली.
गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट, आत्महत्या करण्यामागची धक्कादायक कारणे समोरदरम्यान, या घटनेची कसून चौकशी करावी, तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गोविंद यांच्या मेहुण्याने केली. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, तपासातून अनेक धागेदोरे उघडकीस येत आहे.
'माझ्या आयुष्यातून निघून गेला तर..' माजी उपसरपंचाच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा व्हिडिओ व्हायरल