Karisma Kapoor: 1900 कोटी दिले अजून किती पाहिजे आणि…, पूर्व पतीच्या निधनानंतर संपत्तीसाठी करिश्मा कपूर कोर्टात
Tv9 Marathi September 12, 2025 03:45 PM

Karisma Kapoor on Sunjay Kapur Property: दिवंगत उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद सुरु आहेत. संपत्तीचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. अशात अभिनेत्री आणि संजय कपूर याची दुसरी पत्नी करिश्मा कपूर हिने मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्या वतीने संपत्तीतील अधिकारासाठी कोर्टात धाव घेतली आहे. ज्यानंतर संजय कपूर याची विधवा पत्नी प्रिया हिने करिश्माच्या वकिलांना असं उत्तर दिलं, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दोघांनी लावले एकमेकांवर गंभीर आरोप…

बुधवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने करिश्मा कपूरहिची मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. याचिकेत करिश्माकपूर हिने वडिलांच्या संपत्तीत हक्क मागितला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूर हिच्या मुलांच्या वतीने वरिष्ठ वकील महेश जेठमलानी आहेत. तर प्रिया हिच्या वतीने राजीव नायर आणि श्रेयन तेत्रन आहेत. या सुनावणीत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

प्रकरणावर सुनावणी होत असताना प्रियाने दावा केला आहे की, प्रकरण विचार करण्यासारख आहे. प्रिया म्हणाली, ‘याचिका दाखल करण्याआधीच समायरा आणि कियान यांना ट्रस्टने 1900 कोटींची संपत्ती दिली आहे. राणी कपूर ट्रस्टने त्यांना त्यांचा अधिकार दिला आहे.’ प्रिया हिचे वकील म्हणाले, ‘मला माहिती नाही त्यांना संपत्तीमध्ये आणखी किती वाटा हवा आहे .. ‘ याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, करिश्मा आणि संजययांच्या घटस्फोटाला आज अनेक वर्ष झाली आहेत. घटस्फोटादरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. अखेर घटस्फोटानंतर दोघं विभक्त झाले  आणि करिश्मा हिने दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभांळ करण्याचा निर्णय घेतला. तर संजय कपूर याने तिसरं लग्न केलं.

घटस्फोटानंतर  करिश्मा आणि संजय यांच्यामधील वाद कालांतराने कमी झाले. मुलांसोबत दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. पण अचानक संजय कपूर याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

संजय कपूर याच्या निधनानंतर आता संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. हे वाद कोर्टात पोहोचले आहेत. करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी वडील संजय कपूरच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. एवढंच नाही तर, प्रिया हिने बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप देखील लावला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.