Rahul Gandhi News : CRPF कडून मल्लिकार्जून खर्गेंना पत्र; राहुल गांधींची केली तक्रार, गंभीर मुद्दा आणला समोर...
Sarkarnama September 12, 2025 01:45 PM

Rahul Gandhi’s Security Breach : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तक्रार करणारे पत्र केंद्रीय राखीव पोलील दलाच्या व्हीआयपी सिक्युरिटीच्या प्रमुखांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पाठविले आहे. त्यामध्ये राहुल यांच्या मागील काही महिन्यांतील परदेश दौऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

CRPF च्या व्हीआयपी सिक्युरिटीचे सूनील जून यांच्याकडूनराहुल यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी राहुल यांनाही पत्र लिहिले आहे. खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात राहुल हे झेड प्लस सुरक्षेचे वारंवार उल्लंखन करत आहेत. ते सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेत नाहीत. सुरक्षा यंत्रणांचा सल्ला ते अनेकदा दुर्लक्षित करत असल्याची तक्रार जून यांनी केली आहे.

राहुल गांधी यांच्याकडून सीआरपीएफ सिक्युरिटीच्या येलो बुक प्रोटोकॉलचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रामुख्याने राहुल यांच्या मागील काही महिन्यांतील परदेश यात्रांबाबत तक्रार करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनाही कोणतीही माहिती न देता ते परदेशात जात आहे. हा प्रोटोकॉल व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी महत्वाचा असून त्याचे पालन करणे यंत्रणांसाठी बंधनकारक असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

Nitin Gadkari News : माझ्याविरोधात 'पेड पॉलिटिकल कॅम्पेन' चालविले! नितीन गडकरी यांचा मोठा दावा, कुणावर साधला निशाणा?

झेड प्लस एएसएल सुरक्षा असलेल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींनी परदेश दौऱ्याबाबतची माहिती किमान 15 दिवस आधी सुरक्षा यंत्रणांना द्यायला हवी. पण राहुल गांधी असे करत नाहीत. देशातील मोजक्या अतिमहत्वाच्या व्यक्तींमध्ये राहुल गांधी आहेत. तरीही ते सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत, अशी नाराजी पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

Bihar Assembly Election : बिहारमध्ये 'एनडीए'ला धक्का बसणार? राहुल-तेजस्वी जोडीचं एक काम वरचढ...

राहुल गांधी यांचे मागील नऊ महिन्यांत सहा परदेश दौरे झाले आहेत. प्रत्येकवेळी त्यांना प्रोटोकॉलचे पालन केलेले नाही. एकाही दौऱ्याची माहिती यंत्रणांना देण्यात आली नाही. या प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही तर राहुल गांधी यांना सुरक्षेबाबत मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत राहुल यांना सूचित करावे, अशी विनंती सूनील जून यांनी खर्गे यांच्याकडे केली आहे.  

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.