तडीयाळे तलावात कार बुडाली
esakal September 12, 2025 08:45 AM

डहाणू, ता. १० (बातमीदार) : डहाणू-चिंचणी सागरी राज्यमार्गावर कारच्या समोर मोकाट जनावरे आल्याने त्यांना वाचवताना कार गावतलावात जाऊन तिला जलसमाधी मिळाली. सुदैवाने चालक नयन हेमंत दवणे प्रसंगावधान राखून कार बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. मंगळवार (ता. ९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास डहाणू येथील इस्पितळामध्ये रुग्णाला कारने नेऊन नयन हे परत येत होते. तडीयाळे गावतलावाच्या काजनजीक अचानक कारच्या समोर गाय, बैल आल्यामुळे त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार पाण्याने काठोकाठ भरलेल्या तलावात जाऊन पडली. पहाटे दीड वाजताच्या सुमारास वाणगाव पोलिसांना पाचरण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.