सोलापूर : सोलापूर शहरात बुधवारी रात्रभर पावसाने झोडपले. शहर व हद्दवाढ भागातील साधारण १५० नगरांमधील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. शेळगी, मित्रनगर, विडी घरकूल, २५६ गाळा, कवितानगर आदी भागातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले. शहरात ७१ ठिकाणी लोकांच्या घरांत पाणी शिरले. घरात पाणी घुसल्याने प्रभाग क्र. १, २ व प्रभाग १०, ११, १२, २४, २५, मध्ये जनजीवन विस्कळित झाले.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासामुसळधार पावसामुळे स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. बाधित परिसरात आमदार विजयकुमार देशमुख व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. घरामध्ये शिरलेले पाणी तातडीने बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण; टोलेजंग इमारतीशहर विकास आराखड्यातील नियम बासनात गुंडाळून बिल्डर, अधिकारी आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमताने नाले बुजवून, वळवून नैसर्गिक वहिवाटावर प्लॉटिंग, पैस अन् शहर भकास केले. नाल्याच्या बफर झोनमध्ये अतिक्रमण करून टोलेजंग इमारती उभारल्या. नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सहा मीटरच्या बफर झोनमध्ये अतिक्रमण झाल्याने पाण्याची वाट बंद झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
सात व्यक्तींना काढले बाहेरशेळगी येथील कुमार स्वामी नगरात पाण्यात अडकलेल्या सात व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. शेळगी नाला लोक वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. शेळगी नाला ओव्हर फ्लो झाल्याने प्रभाग क्र. २ मित्रनगर, दहिटणे, शेळगी भागातील अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली.
शेळगी नाला ओव्हर फ्लो
शहरात परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेळगी नाला ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे या नाला परिसरात वसलेल्या लोकवस्तीला याचा मोठा फटका बसला आहे. नाल्यातील पाणी सखल भागांमध्ये साचले आहे. तुळजापूर नाका क्रॉस करून हा नाला जुना पूना नाका परिसरातून वाहते. वसंत विहार, अवंती नगर या ठिकाणच्या सखल भागांमध्ये व रस्त्यावर पाणी वाहत आहे.
तीन महामार्गावर साचले पाणीसोलापूर शहर परिसरातून जाणाऱ्या एकूण आठ महामार्गापैकी तीन महामार्गावर साचलेल्यापाण्याने नदीचे रुप आले होते. यामध्ये सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-होटगी या मार्गांवर पाणी साचले तर सोलापूर-होटगी दरम्यान असलेल्या पुलावर पाणी आल्याने गुरुवारी गावांचा संपर्क तुटला होता.
सुशोभीकरण केलेले चौक बनले स्वीमिंग टॅंक
महापालिकेने स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत अक्कलकोट रोड पाणी टाकी परिसरातील चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. चौक सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्ची टाकले. बुधवारच्या पावसाने सुंदर व आकर्षक चौकाचे स्वीमिंग टॅंक बनल्याचे पाहायला मिळाले.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा आमदार देशमुखांनी केली पाहणीशेळगी नाला ओव्हर फ्लो याचा सर्वाधिक फटका शहर उत्तर मतदारसंघामधील भागाला बसला. त्यामध्ये प्रामुख्याने शेळगी, विडी घरकूल, तुळजापूर नाका आदी परिसर बाधित झाले. पाऊस थांबताच आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी गुडघाभर पाण्यात बाधितांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.