- rat१२p२.jpg-
२५N९०९८८
लांजा ः संजय यादव यांचे अभिनंदन करताना राज्याचे मत्स्य आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे.
भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी यादव
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १२ ः भाजपच्या दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी लांजा येथील संजय यादव यांची निवड झाली आहे. लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच भाजपचे गटनेता म्हणून संजय यादव लांजा येथे कार्यरत होते. गटनेतापदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भाजप युवामोर्चाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदाची जबाबदारी दिली होती तसेच लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर जिल्हा चिटणीस पदाचीदेखील जबाबदारी सोपवण्यात आली होती. या सर्व जबाबदाऱ्या यादव यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांची राणे समर्थक अशी ओळख असून, भाजपच्या माध्यमातून सातत्याने ते पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असतात.
---