‘वंदे भारत’ला अतिरिक्त डबे जोडा
प्रवाशांची मागणी ; दसरा, दिवाळीचे नियोजन करा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
भारत एक्स्प्रेस कोकणवासियांच्या पसंतीस उतरली आहे. ८ डब्यांची एक्स्प्रेस १६ डब्यांची चालवण्यात यावी, अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे; मात्र रेल्वेबोर्डाने त्याकडे कानाडोळा केला आहे. गणेशोत्सवात रेल्वेगाड्यांना होणाऱ्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी काही दिवसांकरिता सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात १६ डबे जोडले होते. त्यामुळे गर्दी विभाजित होण्यास मदत झाली होती. दसरा, दीपावली सणांमध्येही रेल्वेगाड्यांना गर्दी उसळणार आहे. सणांच्या कालावधीत वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडावेत, अशी मागणी आत्तापासूनच करण्यात येत आहे; मात्र कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे वाढवण्याची तसदी रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
---