१ राम गोपाल वर्माचा रंगीला सिनेमा ऑक्टोबर २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
२ सुधारित ध्वनी-दृश्य गुणवत्तेसह प्रेक्षकांना हा क्लासिक पुन्हा अनुभवता येणार आहे.
३ आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि ए. आर. रहमानचं संगीत पुन्हा एकदा रंगीला जादू रंगवणार आहे.
नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेला राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहामध्ये पुनर्प्रदर्शित होणार असून, या वेळी प्रेक्षकांना सुधारित ध्वनी आणि दृश्य गुणवत्तेसह ही कथा अनुभवता येणार आहे.
८ सप्टेंबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेला ‘रंगीला’ त्या काळी जबरदस्त हिट ठरला होता. ए. आर. रहमानच्या मनमोहक संगीतामुळे, अनोख्या कथेच्या मांडणीमुळे आणि उर्मिलाच्या संस्मरणीय अभिनयामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. रहमानने दिलेला हा पहिलाच ओरिजिनल साउंडट्रॅक असून, ‘तन्हा तन्हा’, ‘यारे यारे’ आणि ‘रंगीला रे’ यांसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत.
View this post on InstagramA post shared by Ultra Bollywood (@ultrabollywood)
अल्ट्रा मीडियाच्या ‘अल्ट्रा रीवाइंड’ उपक्रमांतर्गत हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असून, जुने प्रेक्षक आणि नवी पिढी, दोघांनाही या क्लासिकचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाशी निगडित आठवणी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
FAQs
रंगीला सिनेमा पुन्हा केव्हा प्रदर्शित होणार आहे?
ऑक्टोबर २०२५ मध्ये सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
रंगीला चित्रपटात प्रमुख भूमिका कोणत्या कलाकारांनी केल्या आहेत?
आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
रंगीला चित्रपटाचं संगीत कोणी दिलं आहे?
संगीत ए. आर. रहमान यांनी दिलं आहे.
रंगीला री-रिलीजमध्ये काय नवीन असणार आहे?
प्रेक्षकांना सुधारित ध्वनी आणि दृश्य गुणवत्तेसह हा सिनेमा अनुभवता येईल.
Birthday Special: बाबो! ललित प्रभाकर आजही व्हॉस्टअॅप वापरत नाही! ऋता दुर्गुळेनं केला खुलासा... म्हणाली, 'आम्ही बोलताना...'