सायंकाळी उठला अन् घरासमोरील नाल्यात पडला; ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
Saam TV September 13, 2025 06:45 PM
  • वर्ध्यात नालीच्या पाण्यात चिमुकला गेला वाहून

  • खेळत असताना घरासमोरील नालीत पडला.

  • तीन वर्षीय डुग्गु पंकज मोहदूरे या चिमुकल्याचा मृत्यू.

  • वर्धेच्या गणेश नगर येथील घटना.

वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोरील नाल्यात पडून एका ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय बालक सायंकाळी उठला. नंतर घराबाहेर जात असताना नालीत पडला. चिमुकला अवघ्या तीन सेकंदात नालीच्या प्रवाहान वाहून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चिमुकल्याचा नालीत वाहून गेल्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

वर्ध्यात सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय. सततच्या पावसामुळे गावातील नाल्याही ओसंडून वाहत आहे. अशातच गावातील एका बालकाचा नाल्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. डुग्गु पंकज मोहदुरे असे तीन वर्षीय बालकाचे नाव आहे. तो वर्ध्याच्या गणेश नगर येथील रहिवासी आहे.

ठाणे, पुण्यासह ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा GR जाहीर, वाचा यादी | VIDEO

सायंकाळी झोपेतून उठून तो बाहेर गेला. मोहदुरे यांच्या घराबाहेर एक मोठी नाली आहे. सायंकाळी झोपेतून उठून डुग्गु घराबाहेर पडला. अचानक तोल गेला आणि चिमुकला नाल्यात पडला. ही संपूर्ण घटना घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलगा अवघ्या तीन सेकंदात नालीच्या प्रवाहात वाहून गेल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यामातून निदर्शनास आले आहे.

भाजपच्या माजी नगरसेवकानं नाशिकमध्ये खून केला; ठाकरे सेनेच्या खासदाराचा गंभीर आरोप

चिमुकला वाहून जात असताना घराजवळ कुणीही उपस्थित नव्हते. तब्बल अर्धा किलोमीटरचिमुकला वाहून गेला. मुलगा अचानक गायब झाल्याने त्याचा शोध सुरू झाला. कुणी अपहरण केल्याचा संशय कुटुबियांनी व्यक्त केला. पण नंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून चिमुकला नाल्यात वाहून गेल्याचे समोर आले. यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.