Space News : 16000 च्या स्पीडने येतंय संकट, संपूर्ण पृथ्वीच धोक्यात?
GH News September 13, 2025 09:18 PM

NASA Asteroid News : अंतराळात प्रत्येक क्षणाला काहीतरी घडत असतं. यातील साही घटना या मानवाला समजतात. तर काही घटना या माणवाच्या आकलनाच्या बाहेरच्या असतात. आपल्या आकाशगंगेत अनेक लघुग्रह, उल्का, अशनी आहेत. ज्या प्रत्येक क्षणाला अंतराळात फिरत असतात. यातील काही उल्का, उल्कापिंड, अशनी पृथ्वीवर येऊन आदळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या असेच एक मोठे संकट पृथ्वीवर येऊ धडकणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण सध्या एक अशनी (Asteroid) तब्बल 16000 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पृथ्वीकडे येत असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीकडे एक अशनी तब्बल सोळा हजार प्रतितास या वेगाने पृथ्वीकडे मार्गक्रमण करत आहे. याची नासानेदेखील पुष्टी केली आहे. या अशनीचे नाव 2025 QV9 असे ठेवण्यात आलेले आहे. हा अशनी एक महाकाय दगड आहे. शास्त्रज्ञांनी सांगितल्यांनुसार हा महाकाय दगड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. साधारण 100 फुट जाड हा अशनी आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनुसार हा अशनी जेव्हा पृथ्वीच्या जवळून जाईल, तेव्हा त्याचे आणि पृथ्वीचे अंतर साधारण 20 लाख किलोमिटर असेल. हे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतरापेक्षा पाच पट अधिक आहे. त्यामुळेच सध्याच मानवजातीला काही संकट नसल्याचे म्हटले जाते आहे. मात्र हा अशनी पृथ्वीच्या फारच जवळून जात असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.

2025 QV9 अशनी नेमका खास का आहे?

2025 QV9 हा अशनी ‘Aten ग्रुप’ श्रेणीत मोडणारा आहे. हा अशनी सध्यातरी पृथ्वीसाठी धोकादायक नाही. मात्र त्याच्या मार्गात थोडाजारी बदल झाला तर हा बदल पृथ्वीसाठी संकटाचा ठरू शकतो. जेव्हा एखादा अशनी पृथ्वीपासून 74 लाख किलोमीटर कक्षेत येतो तसेच या अशनीचा आकार 85 मीटरपेक्षा जास्त असेल तेव्हा तो पृथ्वीसाठी धोका असल्याचे मानले जाते.

जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांचे लक्ष

दरम्यान, शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 QV9 हा अशनी जेव्हा पृथ्वीजवळून जाईल तेव्हा तो मानवी डोळ्यांना दिसणार नाही. मात्र टोलिस्कोपच्या माध्यमातून त्याला पाहता येईल. जगभरातील अंतराळ संशोधन संस्था 2025 QV9 या अशनीवर लक्ष ठेवून आहेत. अंतरिक्षातील जग मोठे आकर्षक आणि गूढ आहे. पृथ्वीभोवती प्रत्येक सेकंदाला हजारो अशनी फिरत असतात. या अशनीच्या चालीमध्ये काही बदल झाल्यास पृथ्वीवर संकट ओढावू शकते. भविष्यात पृथ्वीसाठी हे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळेच 2025 QV9 नावाच्या अशनीबाबत नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.