बीडच्या अंबाजोगाईत कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणीत अवघड जागी मार लागल्याने पती कैलास सरवदे याचा मृत्यू झाला.
पत्नी माया सरवदेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
Beed : बीडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमधील अंबाजोगाई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी येथे एका पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात बुधवारी (१० सप्टेंबर) घडली. याप्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?कैलास सरवदे (वय ३७ वर्ष, राहणार क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे मृत पतीचे नाव आहे. कैलासची बहीण ज्योती तरकसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कैलास याचे सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी लग्न झाले होते. मायाचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली आहेत, तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास हा शरीराने अपंग होता. त्याला दारु पिण्याची सवय होती. यावरुन कैलास आणि माया यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत. माया ही कैलासला नेहमी उपाशी ठेवत असे.
मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला१० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कैलास दारू पिऊन घरी आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून त्याच्या पोटावर आणि अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी, शेजारच्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण मायाने 'आमच्यामध्ये पडू नका. हा रोज दारु पिऊन असाच करतो, मी याला फुकट सांभाळायचं का?' असे म्हणत सर्वांना शिवीगाळ केली. त्यादरमान कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला.
Akola : अस्वच्छतेमुळे आरोग्यमंत्र्याचा दौरा रद्द! आमदारांची आरोग्य विभागावर टीका, सरकारला दिला घरचा आहेरजखमी अवस्थेमध्ये नातेवाईकांनी कैलासला रिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले. तेव्हा उपचार सुरु करण्याआधी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला त्याचा मृत्यू हा दारूच्या अतिसेवनामुळे झाल्याचा समाज होता. पण दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबर रोजी मिळालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलंकैलासची पत्नी मायाने जाणूनबुजून तिच्या पतीवर घातक मारहाण करुन त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये माया सरवदे हिच्यावर कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पीएसआय रविकुमार पवार यांनी दिली आहे.
Shocking : हॉस्पिटलमध्ये पुरूष रुग्णांचा लैंगिक छळ; चुंबन, शरीरसबंध ठेवणारी डॉक्टर महिला दोषी