सोलापूर : बीड (beed) जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी कला केंद्रातील नर्तिका प्रार्थना गायकवाडच्या पोलीस कोठडीत 02 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणी पोलीस कोठडी संपल्याने आज आरोपी पूजा गायकवाड हिला बार्शी येथील न्यायालयात हजर करण्यात आले, कोर्टाने (Court) दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पूजाला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. यापूर्वी गोविंद बर्गेच्या मेहुण्याने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी पृष्ठे इतर समुदाय (प्रॉयल्स (प्रोयाना आहे की कक्क्य अटक केली होती, त्यावेळी न्यायालयाने तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता, पूजाचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
गोविंद बर्गे यांनी पिस्तूल कुठून आणि कशी आणली? पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी करायची आहे. तसेच, वैराग येथील जो प्लॉट प्रार्थना गायकवडच्या नावे आहे, त्यात गोविंद बर्गे हे साक्षीदार आहेत. त्यामुळे पूजाने हा प्लॉट कसा मिळवलाह्या सर्व बाबींचा तपास करावयाचे असल्याने पोलिसांनी पूजाच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील युवक आणि माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा पारगाव येथील कला केंद्रात नर्तिका असलेल्या पूजा गायकवाडच्या प्रेमात वेडा झाला होता. पूजाचे सर्व हट्ट पुरवत तिच्यासाठी महागडे मोबाईल, सोने, पैसा आणि प्लॉटही त्याने खरेदी करुन दिले होते. मात्र, गोविंदकडून पुजाला आणखी बरंच काही हवं होतं. गेवराई येथील अलिशान घरही पुजाला पाहिजे होते, त्यातूनच दोघांमध्ये खटके उडत होते. आधी प्रेम आणि नंतर दोघांमध्ये निर्माण झालेल्या तणावातूनच गोविंदने आत्महत्या केल्याचा आरोप गोविंदच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच, गोविंदकडे बंदुक नव्हती, त्यामुळे त्यांच्याशी घातपात झाल्याचेही त्याच्या भाच्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे, ही बंदुक नेमकी कुठून आली, या मृत्यूप्रकरणी सत्य काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न वैराग पोलीस करत आहेत.
आणखी वाचा