समाजाची माथी कशासाठी भडकवता? खोतांचा भुजबळांना सवाल, म्हणाले, उपसमितीवर विश्वास नाही का?
Marathi September 13, 2025 09:26 PM

छगन भुजबळवरील सदाभौ खत: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे जेष्ठ मंत्री आहेत, ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी असे मत स्वदेशी सदाभौ खत (सदाभौ खत) यांनी व्यक्त केले. सरकारने नेमलेल्या उप समितीवर त्यांचा विश्वास नाही का? हे त्यांनी स्पष्ट करावं असेही खोत म्हणाले. समाजाची माथी कशासाठी भडकवता ? असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी भुजबळांना केला आहे.

महाराष्ट्राची वाटणी जातीपातीमध्ये व्हायला लागली

अलीकडच्या काळात महाराष्ट्राची (Maharashtra) वाटणी जातीपातीमध्ये व्हायला लागली आहे असे सदाभाऊ खोत (सदाभौ खत) म्हणाले. आरक्षण म्हणजेच आमच्या जीवातील बदल होण्याचा मार्ग अशी स्थिती काही लोकांनी महाराष्ट्रात निर्माण केली आहे. प्रस्थापित मराठ्यांनी वेगवेगळ्या जातीचे नेते निर्माण करुन एकमेकांसोबत भांडण्यासाठी इतरांना उभे केल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. विस्थापितांची बाजू देवेंद्र फडणवीस यांनी घेतली हे मूळ दुखणं आहे. चक्रव्यूह निर्माण करुन देवेंद्र फडणवीस यांना फसवण्यासाठी षडयंत्र आखलं जात असल्याचे खोत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांकडून आरक्षणाचा विषय सोडवण्याठी प्रयत्न

संपूर्ण मराठा समाज OBC मध्ये येणार नाही हे दोन्ही बाजूच्या नेत्यांना चांगलं माहिती आहे असे खोत म्हणाले. आरक्षणाचा विषय सोडवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे खोत म्हणाले. फडणवीस हे आडनाव असल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम आहे. देशमुख, पाटील, पवार आडनाव असतं तर लोकांनी पायघड्या घातल्या असत्या असंही खोत म्हणाले. देवाभाऊ माझ्यासाठी सावलीसारखे आहेत. त्यांचे आडनाव देशमुख किंवा पाटील असते तर हा सदाभाऊ कधीच आमदार होऊ शकला नसता. देवाभाऊंचे आडनाव फडणवीस आहे म्हणूनच आमच्याकडे पदे आहेत. देवेंद्र फडणवीस हे 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत असं सदाभाऊ खोत म्हणाले. आपण अपघाताने आणि अपवादाने राजकारणात आलो आहोत, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच आमदार आणि मंत्री झालो, राजकारणात फडणवीसांचा आधार मिळाला असं आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. आता आमच्याकडे पद आहे म्हणून आमच्यामागे गडी आहेत, नाहीतरी कुणीही विचारत नाही असं सदाभाऊ खोत म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली.

महत्वाच्या बातम्या:

Sadabhau Khot : देवाभाऊचे आडनाव जर देशमुख किंवा पाटील असते तर मी कधीच आमदार झालो नसतो : सदाभाऊ खोत

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.