बदलत्या वातावरणाचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर त्यांचा परिणाम केसांवर देखील होतो. कारण दमट वातावरणामुळे अनेकांना केस गळण्याच्या व डोक्यात कोंडा होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशातच तुम्हाला कोंड्यामुळे डोक्यात खूप खाज येते आणि केसंही पांढरे झाले आहेत तर ते कोरड्या स्कॅल्पचे लक्षण आहे. कोरड्या स्कॅल्पमुळे केवळ खाज सुटत नाही तर केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. जर तुम्हाला या समस्येने त्रास होत असेल, तर आजच्या लेखात ३ घरगुती उपाय सांगितलेले आहे जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला जाणून घेऊयात.
नारळाचे तेलकेसांची वाढ चांगली व्हावी यासाठी नारळाचे तेल प्रत्येक घरामध्ये वापरले जाते. तर नारळाचे तेल केवळ केसांना पोषण देत नाही तर कोरड्या स्कॅल्पसाठी एक रामबाण उपाय देखील आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डोक्याला थोडे कोमट नारळाच्या तेलाने मालिश करू शकता आणि सकाळी तुमचे केस धुवू शकता. काही दिवसांत तुम्हाला फरक दिसू लागेल.
कोरफड जेलकोरफडीमध्ये मॉइश्चरायझिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे कोरड्या आणि खाज येणाऱ्या स्कॅल्पला आराम देतात. यासाठी ताजे कोरफडीचे जेल थेट स्कॅल्पवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने तुमची स्कॅल्प लवकरच निरोगी होईल.
दह्याचा हेअर मास्कदह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे स्कॅल्प स्वच्छ करण्यास आणि स्कॅल्पमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये दही घेऊन त्यात थोडे मध मिक्स करून पेस्ट बनवा. ते तुमच्या स्कॅल्पवर चांगले लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवा. हा मास्क तुमच्या स्कॅल्पला हायड्रेट करेल आणि तुमचे केस मऊ करेल.
या सोप्या उपायांचा अवलंब करून, तुम्ही कोणत्याही केमिकलशिवाय तुमच्या कोरड्या टाळूच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि तुमचे केस निरोगी बनवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)