Emergency Landing at Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावर गुरुवारी एका विमानाचे ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आले. विमानात असलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने विमान कंपनीने ‘मेडिकल इमर्जन्सी’ जाहीर करून प्राधान्याने लँडिंगची मागणी केली होती. कोल्हापूर विमानतळ प्रशासनाने ती तातडीने मान्य करून विमान सुरक्षित उतरवले. त्यानंतर रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संबंधित विमानाने कोलकात्यातून रायपूरमार्गे उड्डाण केले होते. रायपूर येथे इंधन भरण्यासाठी थांबून दुपारी चार वाजून एक मिनिटांनी त्याने कोल्हापूरकडे प्रयाण केले. मात्र, सायंकाळी प्रवासादरम्यान एका रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने विमान कंपनीने ‘मेडिकल इमर्जन्सी’ घोषित करत ‘प्रायोरिटी लँडिंग’ची मागणी केली.
Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाठलाग करतानाचा थरारक Videoप्राधिकरणाने ती मागणी त्वरित मान्य केल्याने विमान सायंकाळी सुरक्षित उतरले. या घटनेमुळे कोल्हापूर विमानतळ ‘मेडिकल इमर्जन्सी’साठी सज्ज असल्याचे अधोरेखित झाले आहे.