World Archery Championship: ऑलिंपिक पदकविजेतीकडून गाथाचा पराभव; जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये अपयश, उपउपांत्यपूर्व फेरीत हार
esakal September 14, 2025 06:45 AM

ग्वांगझू (दक्षिण कोरिया) : भारताची जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील रिकर्व्ह प्रकारातील पदकांची आशा पुन्हा मावळली. १५ वर्षीय गाथा खडके हिला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या तसेच ऑलिंपिक पदकविजेत्या लिम सी ह्यूऑन हिच्याकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे गाथा खडके हिचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

१४व्या मानांकित गाथा खडके हिने पहिल्या फेरीच्या लढतीत फातिमा हुसेएनली हिला ७-१ असे सहज पराभूत करीत पुढे पाऊल टाकले. गाथा हिने दुसऱ्या फेरीमध्ये थिया रॉजर्सवर ६-० अशी मात करताना दमदार खेळ केला. गाथाला पुढील फेरीमध्ये कॅथरीना बाऊएर हिचे आव्हान होते. गाथा हिने कॅथरीना हिचा संघर्ष ६-४ असा मोडून काढला.

D Gukesh: जगज्जेत्या भारतीयांमध्ये संघर्ष; स्वीस बुद्धिबळ : गुकेश दिव्याची १०३ चालींत बरोबरी रिकर्व्हमध्ये भारतीयांची अपयशाची मालिका

भारतीय खेळाडूंनी जागतिक स्पर्धेतील रिकर्व्ह प्रकारात २०१९मध्ये अखेरचे पदक जिंकले होते. त्यानंतर सहा वर्षे उलटून गेली तरीही या प्रकारात पदक पटकावता आलेले नाही. तरुणदीप राय, अतानू दास व प्रवीण जाधव यांनी सांघिक विभागात २०१९मध्ये रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर भारताला अद्याप या प्रकारात पदक पटकावता आलेले नाही.

दीपिकाकुमारीकडून निराशा

जागतिक व ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपिकाकुमारी हिला यंदाच्या स्पर्धेमध्ये ठसा उमटवता आला नाही. तिचा पहिल्या फेरीतच पराभव झाला. इंडोनेशियाच्या डिनांडा चोयरूनिसा हिच्याकडून तिला हार पत्करावी लागली. भारताने यंदाच्या जागतिक स्पर्धेमध्ये दोनच पदकांची कमाई केली. रिषभ यादव, प्रथमेश फुगे व अमन सैनी यांनी पुरुषांच्या सांघिक विभागात सुवर्णपदक पटकावले.

World Championship Badminton: सात्विक-चिरागकडून पदक पक्कं; पॅरिस ऑलिंपिकमधील पराभवाची परतफेड कोरियन खेळाडूचे वर्चस्व

गाथा खडके हिला उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियाची ऑलिंपिकमधील तिहेरी सुवर्णपदकविजेती लिम सी ह्यूऑन हिचा सामना करावा लागला. पहिल्या सेटमध्ये किम हिने ३०-२६ अशी बाजी मारत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर दोन सेटमध्येही कोरियन खेळाडूचेच वर्चस्व दिसून आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.